लोकमाध्यम न्युज | जळगाव २९ ऑगस्ट २०२४ |
मानराज पार्क जवळील अपघात प्रकरणी आज शुक्रवार ३० रोजी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जन आक्रोश मोर्चा चे आयोजन केले आहे . सकाळी १० : ३० वाजता खोटे नगर ते आकाशवाणी चौकापर्यंत हा मोर्चा येईल . शहरातील महामार्गावर खड्डे आणि भरधाव वेगात येणारे ट्रक व ट्रॅक्टर मुळे जीवघेणे अपघात होत आहेत . याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणा सह आरटीओ, वाहतूक पोलीस / जिल्हाधिकारी हे बघ्याची भूमिका घेत आहेत . तर याबाबत लोकप्रती निधी उदासीन आहेत त्यांना जाग आणण्यासाठी हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे .
चला आपण सुरक्षित होऊ या… आपल्या जळगावला सुरक्षित करूया… झोपलेल्या जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि राज्य शासनाला जागे करूया.
आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी सर्वांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊ या असे आवाहन मोर्चाचे आयोजक माजी उपमहापौर कुलभूषण विरभान पाटील यांनी केले आहे.