जळगाव दि .१ मार्च : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा गावगुंड नेता शहाजहान शेख ज्याच्यावर खून तसेच लैंगिक अत्याचाराचे अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यास तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी. तसेच शहाजहान सारख्या गुंडाला पाठीशी घालणाऱ्या तृणमुलच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही राजीनामा घ्यावा, अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टीतर्फे जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी देण्यात आले.
ममता बॅनर्जींचे सरकार असताना पश्चिम बंगालमध्ये महिला सुरक्षित राहिलेल्या नाही. त्यांच्या आशीर्वादाने तृणमुल काँग्रेसचा गावगुंड नेता शहाजहान शेख हा महिलांवर अत्याचार करीत होता. याशिवाय त्याच्यावर आर्थिक अपहार, बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावणे, असे बरेच आरोप आहेत. ईडी म्हणजेच सक्त वसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घरावर धाड टाकल्यानंतर त्यांनाही मारहाण झाली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी त्या गावगुंडाला तब्बल 55 दिवसांनी अटक केली आहे. त्यास मोकाट सोडण्यापेक्षा थेट फाशीची शिक्षा द्यावी आणि त्यास पाठीशी घालणाऱ्या ममता बॅनर्जी यांनीही स्वतःहून राजीनामा द्यावा, असे भाजपातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर भाजपच्या जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, महिला मोर्चा प्रमुख भारती सोनवणे, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ भंगाळे, तालुका उपाध्यक्ष मिलिंद चौधरी, सरचिटणीस सचिन पवार, गिरीश वराडे, मयूर मराठे, महेश पाटील, रेखा वर्मा, ज्योती निंभोरे, वंदना पाटील, मनिषा जोशी, छाया सारस्वत, भाग्यश्री चौधरी, डॉ. प्रियंका सोनी, रजनी भारती, राजश्री शर्मा, सुधा काबरा आदींच्या सह्या आहेत.