भव्य होळी महोत्सवाच्या कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद
झुलेलाल वॉटर पार्कच्या तिसर्या सीझनचा शानदार शुभारंभ
जळगाव दि.२४ : खान्देशातील एकमेव सर्वात मोठ्या म्हणून ख्यात असलेल्या शिरसोली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्टचा तिसरा सिझन आज मोठ्या उत्साहात सुरू झाला असून याला पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद लाभला आहे. तर, सोमवारी भव्य होळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याच्या बुकींगला देखील उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे.
शिरसोली रोडवरील अनुभूती स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या पाचदेवी माता मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्टमध्ये यंदा तिसरे पर्व हे होळीच्या शुभ मुहुर्तावर २४ मार्च रोजी मोठ्या उत्साहात सुरू झाले. प्रभू श्रीराम आणि भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमांचे पूजन करून तिसर्या सीझनला विधीवत प्रारंभ करण्यात आला. आज पहिल्याच दिवशी शेकडो स्त्री-पुरूषांनी याचा आनंद लुटला.
आधीच्या दोन वर्षांमध्ये खान्देशातील आबालवृध्दांचा येथे प्रचंड प्रतिसाद लाभला होता. यंदा तर अजून बर्याच नव्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. यात प्रामुख्याने सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा वेव्ह पुल तयार करण्यात येत असून याच्या सोबतीलाच गेम झोन देखील लोकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, यंदा होळीनिमित्त येथे गेल्या वर्षीप्रमाणेच दिनांक २५ मार्च रोजी होली फुलोवाली या स्पेशल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात गायिका प्रिया आणि डिजे साक्षी यांच्या संगतीने दिवसभर शानदार संगीतमय कार्यक्रम होणार आहे. याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ढोल धमाका असून यात दिल्ली येथील ढोल पथकाच्या तालावर उपस्थितांना बहारदार नृत्य करता येणार आहे.
याचे तिकिट मूल्य प्रौढांसाठी प्रत्येकी ५९९ तर बालकांसाठी ४९९ रूपये इतके आहे. या संदर्भात बुकींगसाठी आपण ९८ ९० ७७ ०८ ५९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन झुलेलाल वॉटर पार्कच्या वतीने संचालक नीरज जेसवानी यांनी केले आहे.