मनसे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या पत्नी डॉक्टर लीना पाटील यांचा प्रचारात सक्रिय सहभाग..
लोकमाध्यम न्युज | जळगांव ९ नोव्हेंबर २०२४ |
जळगांव – डॉ. लीना पाटील यांनी निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. डॉ.लीना पाटील या
डॉ.अनुज पाटील यांच्या सुविद्य पत्नी आहेत.
डॉ. अनुज पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उमेदवार आहेत. ते निवडणुकीच्या तयारीत असून मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रचारात डॉ. लीना पाटील सक्रिय भूमिका निभावत आहेत आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्नशील आहेत.
डॉ. लीना पाटील यांची मतदारांशी विशेष नाळ जोडण्याची पद्धत आणि प्रभावी संवादामुळे प्रचारात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. त्या सामाजिक माध्यमांवरूनही प्रचार करत असून मतदारांना त्यांच्या पतीच्या योजनांविषयी आणि उद्दिष्टांविषयी माहिती देत आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे मतदारांत उत्साह दिसत असून, निवडणुकीत त्यांच्या कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.
मनसेचे उमेदवार असलेले डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचारासाठी डॉ. लीना पाटीलचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे, आणि हे दोघेही मनापासून जनतेच्या सेवेसाठी झटत आहेत.
दरम्यान डॉ. के डी पाटील हे डॉ.अनुज पाटील यांचे वडील असून ते ही शहरातील विविध भागात महत्त्वाच्या भेटीगाठी घेत आहेत व संवाद साधत आहे.
महेंद्र पाटील(संगणक तज्ञ पुणे) हे डॉ.अनुज पाटील यांचे शालक असून
पूर्णवेळ सुट्टी टाकून प्रचारामध्ये सक्रिय आहेत.