लोकमाध्यम न्युज | जळगाव २४ ऑगस्ट २०२४ |
बदलापूर येथील शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या अत्याचारा विरोधात महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती परंतु माननीय न्यायालयाने बंद ठेवू नये असे आदेश दिल्याने बंद मागे घेतला परंतु शासनाच्या आडमुठे धोरणाच्या विरोधात महाविकास आघाडी तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ 11 ते एक वाजेपर्यंत काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले.
बदलापूर येथे दोन चिमूरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडी जळगाव महानगरच्या वतीने काळ्या फिती लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष शाम तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज मलिक, ज्येष्ठ नेते सलीम पटेल, माजी सभापती लकी टेलर, अशोक लाड वंजारी, वाल्मीक पाटील, नामदेव चौधरी, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाकिर पठाण, शिवसेना उपमानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, प्रकाश बेदमुथा, निलेश ठाकरे, विपीन पवार, जकीर बागवान, निणाजी गायकवाड, ॲड. सलीम पटेल, मुजिफ पटेल, संग्राम सूर्यवंशी, दीपक सोनवणे, राहुल भालेराव, गोकुळ चव्हाण, विशाल पवार, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, शिवसेना महिला आघाडी महानगरप्रमुख गायत्री सोनवणे, अमिणा तडवी, छाया कोरडे, योगिता शुक्ल, सुमन मराठे, रत्ना बागुल, उपमहा नगर प्रमुख जया तिवारी, निता सांगोळे, शारदा तायडे, आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.