जळगाव दि.२२ : रोजलॅण्ड इंग्लिश मिडीयम शाळेत पूर्व प्राथमिक शिक्षणातून बालकांमध्ये अध्ययनशीलता, शिस्त व आत्मविश्वास निर्माण होत असून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. रोजलॅण्ड प्री-प्रायमरी स्कूलच्या दिमाखदार दीक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांची प्रचिती आली. या कार्यक्रमाचे आयोजन रोजलॅण्ड इंग्लिश स्कूलमध्ये नुकतेच झाले.
विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ प्राप्त व्हावे या हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्य डॉ. हर्षा खडके व मराठी माध्यमाच्या प्राचार्य वंदना सोले प्रमुख पाहुणे लाभले होते. आपल्या पाल्यांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी पालकांनीही उपस्थिती दिली.
रोजलॅण्ड इंग्लिश मिडीयम व मराठी माध्यमाचे सर्व शिक्षक
उपस्थित होते. प्रारंभी पदवीदान समारंभाचे प्रास्ताविक कविता पाटील यांनी केले.
पदवी गणवेश परिधान केलेल्या चिमुकल्यांनी भाषणात सहभाग घेतला. दीक्षांत मिरवणुकीने विद्यार्थी स्व. लता मंगेशकर सभागृहाच्या मंचावर पाचारण करण्यात आले. रोजलॅण्ड प्री- प्रायमरी स्कूलच्या पूर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या चिमुकल्या विद्याथ्यर्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील पहिली पदवी प्राचार्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. प्रायमरी च्या विद्यार्थ्यानी पब्लिक स्पीकिंग वर भाषणे दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोजलॅण्ड स्कूलच्या प्री प्रायमरी च्या सांस्कृतिक विभागाच्या संयोजनात आर्ट अँड क्राफ्ट, संगीत, तसेच तांत्रिक विभागातील शिक्षक व माध्यमिक विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
संस्थेच्या अध्यक्ष रोजमीन खिमानी प्रधान यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर सिनिअर के.जी. च्या शिक्षिका मुस्कान मोनानी यांनी आभार प्रदर्शन केले.