जळगावमहानगरसांस्कृतिक

सावित्री बाईंनी स्वाभिममानाने जगणं शिकवल : खा.स्मिता वाघ; मनपाच्या खान्देश महोत्सवाचे शानदार उद्घाटन

५ दिवस खाद्यसंकृतीसह मनोरंजनाचा उत्सव

लोकमाध्यम न्युज | जळगांव ४ जानेवारी २०२५ |

जिल्हा परिषदेची अध्यक्षा असल्यापासून खान्देश महोत्सवाशी माझे जवळचे नाते आहे.सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करतोय. ज्या सावित्रीबाईने मला या स्टेजवर बसण्याची संधी दिली, जिथे आम्हाला शिक्षणाचा वसा दिला, तिने वेळप्रसंगी दगड धोंडे अंगावर घेतले, शेण अंगावर घेतलं. पण आज महिलांना स्वाभिमानाने जगणं शिकवल त्या सावित्रीबाईपुढे नतमस्तक व्हायला हवे, असे मत खासदार स्मिता वाघ यांनी  व्यक्त केले.

महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी जळगाव महापालिकेच्या एनयूएलएम व महिला बालविकास विभागातर्फे सागर पार्कवर पाच दिवसीय ‌‘खान्देश महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन खासदार वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, अभिनेत्री ऋतूजा शिंदे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, वैशाली ढेरे, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त धनश्री शिंदे, सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड, सहायक आयुक्त सुमित जाधव, एनयूएलएम व महिला बालविकास विभागाचे अधिक्षक महेंद्र पाटील, कार्यालय अधिक्षक सुनिल गोराणे,एनयूएलएम व महिला बालविकास विभागाच्या गायत्री पाटील उपस्थित होते.
पुढे बोलतांना खासदार स्मीता वाघ म्हणाल्या की, बचत गटाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून हा खान्देश महोत्सवाचे आयोजन केले जातेय. महिलांनी उत्पादीत केलेल्या उत्पादनांचे पॅकेजिंग कसे करावे याबाबत माहिती मिळते. आजचे जग पॅकेजिंग ला महत्व देते, पण आत काय आहे हेही पाहीले पाहीजे. आमची बहिणाबाई आमच्या खान्देश चं आमचं वैभव आहे. खान्देशाची अहिरानी भाषा फार गोड आहे. या व्यासपीठावरूनच अनेक कलावंत तयार झालेले आहेत. खान्देश संस्कृती टिकली तर अहिरानी भाषा टिकेल. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.यातून महिलांच्या प्रगतीसह खान्देशातील कलावंतांनाही व्यासपीठ मिळत असल्याचे त्या म्हणाल्या.


खान्देशची खाद्यसंस्कृती जग प्रसिध्द : आमदार भोळे
यावेळी आमदार सुरेश भोळे म्हणाले की, खान्देश आणि बहिणाबाई महोत्सवातून बचत गटांना मोठे व्यासपीठ मिळते. त्यामुळे जनतेने त्यांना प्रतिसाद द्यावा. खान्देश म्हणजे विविध हिऱ्यांची खाण आहे. खान्देशातील भरीत आणि कळण्याची भाकर ही खाद्यसंस्कृती सातासमुद्रपार गेली आहे. बिबडि, पुरणपोळी , पापड, शेवभाजी ही खान्देशाचे देणे आहे. कलावंताचीही खाण खान्देश असल्याचे त्यांनी सांगीतले.
प्रास्तावीक उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी केले. महोत्सवाबाबतची माहिती सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड यांनी दिली. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.
200 स्टॉल
महोत्सवात खाद्यपदार्थांसह विविध उत्पादनांचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. 3 ते 5 जानेवारी पर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे. यात सायंकाळी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button