कृपाळु शिव साई मंदिर परिसरातील कृपाळु नर्मदेश्वर शिव मंदिरात शिवपिंडी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
जळगाव दि. ३१ : पंचमुखी हनुमान मागील ईश्वर कॉलनी,देविदास कॉलनी, लक्ष्मी नगर परिसरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कृपाळु शिवसाई देवस्थान प्रांगणातील कृपाळु नर्मदेश्वर शिव मंदिरात शिव पिंडीचा भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक ५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक १ एप्रिल सोमवार ते ७ एप्रिल रविवार दरम्यान प्राणप्रतिष्ठा सप्ताह निमीत्त धार्मिक आणि अध्यात्मिक अशा भरघोस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१ एप्रिल सोमवार रोजी शिव पिंडीच्या आगमना निमित देविदास कॉलनीतील रहिवासी शिवपिंडी मूर्ती दान कर्ते डिगंबर चौधरी आणि नंदा चौधरी यांच्या घराच्या प्रांगणात भजन संध्या रात्री ८ वा.
दि.२एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता देविदास कॉलनी, मुकुंद नगर,जोशी कॉलनी,लक्ष्मी नगर,ईश्वर कॉलनी परिसरातून कलश यात्रा, मुर्ती मिरवुणक काढण्यात येणार आहे.
शके १९४५ दि. ३ एप्रिल बुधवार फाल्गुन कृष्ण पक्ष नवमी तिथी सकाळी ९ वाजता गणेश पुजन / पुण्यह वाचन नांदि श्राध्द/पंच गव्य प्राक्षण / कुंडस्य देवता स्थापाना / अग्नी स्थापना / मंडप देवता स्थापना
शके १९४५ दि.४ एप्रिल गुरुवार फाल्गुन कृष्ण पक्ष दशमी तिथी सकाळी ९ वाजता स्थापित देवता स्थापना विधी हवन/नवग्रह देवता स्थापना /मुर्तीचे न्यास पुजन/मुर्तीना धान्यादी वास शय्यानिवास
शके १९४५ दि.५ एप्रिल शुक्रवार फाल्गुन कृष्ण पक्ष एकादशी तिथी सकाळी ९ वाजता स्थापित देवता पुजन मुर्ती प्राणप्रतिष्ठा/हवन / विवाह संस्कार सोहळा / बलीदान/पुर्णा आहुती व महाआरती
एकादशी तिथी श्री गणपती / अन्नपुर्णा देवी/अखंड नर्मदेश्वर महादेव प्राणप्रतीष्ठा व कळस पुजन (पंडित. अतुल बाळकृष्ण पुरेकर यांच्या हस्ते)
दि.५ एप्रिल रोजी रात्री ८ वा भजन संध्या तसेच दिनांक ३ ,४,६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि.७ एप्रिल रविवार संध्याकाळी ५ वाजेपासून महाप्रसाद भांडाऱ्याने प्राणप्रतिष्ठा सप्ताहाची सांगता होणार आहे.
मंदिर परिसरात करावयाच्या गतिविधी व भविष्यात
कबड्डी, मल्लखांब, व्हॉलीबॉल मैदान, मॉर्निंग ट्रॅक व योगा सेंटर तसेच गार्डन व वाचनालय संस्कृतिक कार्यक्रमांसाठी हॉल, स्टेज व खोल्या आदी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष विवेक जगताप यांनी सांगितले.
उपाध्यक्ष प्रदीप पाटील, सचिव उमेश सोनवणे, कोषाध्यक्ष प्रभूलालजी व्यास, कार्यप्रमुख मनोज चौधरी कार्यालय प्रमुख, गणेश सपके, ज्येष्ठ सदस्य दिनकर आप्पा सोनवणे
पुजारी रमेश निकम, संचालक श्रीनिवास पांडे, सदस्य सचिन सोनवणे, अशोक जगताप, चेतन चौधरी, स्वप्निल जगताप, धीरज भाऊ, भावेश बागुल, तसेच प्रभागातील सदस्य महिला मंडळ सदस्य संचालक मंडळ प्राणप्रतिष्ठा सप्ताह सोहळ्यासाठी परिश्रम घेत आहेत.