
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २९ जानेवारी २०२५ |
राज्य शासनाने एस टी च्या केलेल्या भाडेवाढ विरोधात शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने नवीन बस स्थानक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
राज्य शासनाने परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहतूक भाडेवाडी विरोधात शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने शहरातील नवीन बस स्थानक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ व शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे. उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील. गायत्री सोनवणे. युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी. उपमहा नगरप्रमुख नीता सांगोळे. विभाग प्रमुख किरण भावसार. आण्णा भोईटे, कुसुंबा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे, गणेश सोनवणे, शोएब खाटीक, निलेश ठाकरे, विजय बांदल, संजय सांगळे, शरीफ रंगरेज, कलीम खान, हर्षल मुंडे, राधे बाविस्कर, आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






