जळगांव जिल्हाऔद्योगिक

जैन इरिगेशन सिस्टीम्सच्या आस्थापनांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहास सुरुवात

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव ४ मार्च २०२५ |

प्रतिनिधी – ‘सुरक्षा आणि स्वास्थ विकसित भारतासाठी आवश्यक’ ही प्रतिज्ञा घेऊन राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची सुरवात जैन इरिगेशनच्या आस्थापनां मध्ये करण्यात आली. जैन फार्मफ्रेश फूडच्या जैन फुड पार्क, जैन व्हॅली, जैन एनर्जी पार्क, जैन ॲग्रीपार्क,प्लास्टिक पार्क यासह गांधी रिसर्च फाऊंडेशन, अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. दि. ०४ मार्च ते १० मार्च या काळात “राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह” पाळण्यात येणार आहे. आज सकाळी सुरक्षा प्रतिज्ञा घेऊन सप्ताहास सुरवात करण्यात आली.जैन फार्म फ्रेश फूड लि. च्या जैन व्हॅली मध्ये सहकाऱ्यांना सुरक्षेसंबधित प्रतिज्ञा देताना कैलास सैंदाणे, पंकज लोहार व सहकारी.

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त सुरक्षा विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. निबंध स्पर्धा, सेफ्टी व्यंग चित्रकला स्पर्धा व सुरक्षितेसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण सप्ताहात सहकाऱ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी जैन फुड पार्क येथे झालेल्या जनजागृतीपर कार्यक्रमात जैन फार्मफ्रेश फूडस व जैन इरिगेशनचे सहकारी उपस्थीत होते. वरिष्ठ सहकारी सुनील गुप्ता, व्ही. पी. पाटील, जी. आर. पाटील, जी. आर. चौधरी, असलम देशपांडे, आर. डी. पाटील, वाय. जे. पाटील यांच्यासह पंकज लोहार, निखील भोळे, मनोज पाटील, नितीन चौधरी, हेमकांत पाटील, महेंद्र पाटील व सहकारी उपस्थित होते. सुरक्षा विभागाचे अधिकारी कैलास सैंदाणे यांनी सुरक्षितेविषयी जनजागृती करीत प्रतिज्ञा दिली.

प्लास्टीक पार्क येथील प्रशासकीय इमारतीच्या समोरच्या लॉनवर सुरक्षा विभागाचे योगेश बाफना यांच्याकडून सहकाऱ्यांना सुरक्षा विषयीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची शपथ देण्यात आली. तसेच प्लांट आवारातील सहकाऱ्यांनी सुरक्षेविषयी शपथ घेतली.

जैन इरिगेशनच्या प्लास्टीक पार्क येथे प्रतिज्ञा देताना डॉ. योगेश बाफना व सहकारी.

दि. ४जैनजैन इरिगेशनच्या प्लास्टीक पार्क येथे प्रतिज्ञा देताना डॉ. योगेश बाफना व सहकारी. इरिगेशनच्या प्लास्टीक पार्क येथे प्रतिज्ञा देताना डॉ. योगेश बाफना व सहकारी. मार्च १९६६ रोजी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना झाली, म्हणून दरवर्षी ४ मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. औद्योगिक तसेच व्यावसायिक ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्य विषयक सार्वजनिक जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हा सप्ताह साजरा करण्यात येतो. दैनंदिन काम करीत असताना जर आपण खबरदारी घेतल्यास किंवा जागरूकता दाखवल्यास होणारे अपघात टाळता येतात. विनाअपघात त्यात आपला जीवही सुरक्षित राहील आणि कंपनीचे होणारे नुकसानही टळेल. अशी माहिती दोघंही सुरक्षा अधिकाऱ्यांनी सहकाऱ्यांना दिली.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button