जळगांव जिल्हाताज्या बातम्या

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

| लोकमाध्यम न्यूज जळगांव दि. २१ : मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आज दुपारी 4.10 वाजता विशेष विमानाने जळगाव विमानतळावर दाखल झाले. त्यांचे स्वागत करण्यासाठी जळगावचे आमदार राजूमामा भोळे, जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गजेंद्र पाटोळे, तसेच पोलीस विभागाच्यावतीने अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते उपस्थित होते.

मुख्यमंत्री यादव यांचे औपचारिक स्वागत झाल्यानंतर त्यांनी पुढील प्रवासासाठी जळगाव विमानतळावरून हेलिकॉप्टरने बुरहानपूरकडे ( मध्यप्रदेश ) प्रस्थान केले.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी वेळेआधीच पूर्ण केली होती.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button