जळगांव जिल्हामहाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आज राज्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद

दुपारी ४ वाजता सचिवालय जिमखाना येथे पत्रकारांशी संवाद; निवडणूक कार्यक्रमाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा अपेक्षित

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. ४ नोव्हेंबर मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोग आज महत्त्वपूर्ण घोषणा करणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे हे मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता सचिवालय जिमखाना, मंत्रालयासमोर, मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.

या परिषदेत राज्यातील नगरपरिषद, नगरपालिका आणि जिल्हा परिषदा तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक, मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया, आरक्षणाचा आराखडा आणि निवडणूक आचारसंहितेबाबत तपशीलवार माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पत्रकार परिषदेसाठी सर्व वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) डॉ. जगदीश मोरे यांनी यासंदर्भातील आमंत्रण पत्रक जारी केले असून, राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा राजकीय पक्षांकडून सुरू असलेल्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button