जळगांव जिल्हाजिल्हा परिषद

हलगर्जीपणा भोवला – ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित; मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचे आदेश

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. ६ नोव्हेंबर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक अमजद खान असलम खान यांना सेवेतील हलगर्जीपणा व कार्यात अनास्था दाखवल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आदेश जारी केले आहेत.

सदर कर्मचारी वैद्यकीय देयकाचे कार्यासन सांभाळत असताना, विभागीय आयुक्त यांच्या मान्यतेने शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या वैद्यकीय देयकावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचा आवश्यक अभिप्राय न घेता, थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेसाठी देयक सादर करण्यात आले. तसेच, कार्यासनाशी संबंधित कामकाज वेळेत पूर्ण न करणे व अपूर्ण ठेवणे अशा गंभीर निष्काळजीपणाचे प्रकार त्यांच्या कडून आढळून आले.

सदर प्रकरणात नियमबाह्य वर्तन आणि प्रशासकीय प्रक्रियांचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिस्तभंग कारवाईचा भाग म्हणून तत्काळ प्रभावाने निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.

या कारवाईतून मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी स्पष्ट केले आहे की, “जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि शिस्त ही अनिवार्य आहे. कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा किंवा नियमभंग सहन केला जाणार नाही.”या कारवाईच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना संकेत दिले आहेत.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button