जळगावसामाजिक

शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला : अशोक जैन, अध्यक्ष जैन उद्योग समूह

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. १८ डिसेंबर २०२५ : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे निधन झाल्याचे वृत्त दुःखदायक आहे. जगातील सर्वात उंचीचा स्टॅचू ऑफ युनिटी हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात भव्य प्रकल्प मानला जातो. तसेच संसद भवनातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासह असंख्य कलाकृती त्यांनी निर्माण केल्या.

जैन हिल्स येथील जगप्रसिद्ध गांधी तीर्थच्या प्रांगणातील महात्मा गांधी यांचा पुतळा आणि इतर लहान पुतळेही त्यांनीच साकारलेले आहेत. भारतीय कला, संस्कृतीच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे म्हणता येईल.

त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 25 फेब्रुवारी 2020 ला भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनचा ‘कांताई जैन साहित्य कला-जीवन गौरव’ हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता, याचा विशेष अभिमान आम्हाला आहे. त्यांनी साकारलेली शिल्प ही चिरकाल आठवणीत राहतील, हे नक्की.असा शिल्पकार होणे नाही…

अशोक जैन,अध्यक्ष जैन उद्योग समूह

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button