जळगावमहापालिका निवडणुक

जळगाव मनपा निवडणूक रणधुमाळी; आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

१९ प्रभागांत २८७ नामनिर्देशनांची विक्री; २५० उमेदवारांनी भरले अर्ज

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. ३० : जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी महापालिका मुख्यालयात दिवसभर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. एकूण १९ प्रभागांत २८७ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली असून त्यापैकी २५० उमेदवारांनी प्रत्यक्ष अर्ज दाखल करून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. भाजप, शिवसेना (शिंदे व उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), काँग्रेससह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदविल्याने राजकीय वातावरण तापले आहे.आज दिनांक ३० डिसेंबर अर्ज  भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने उत्सुकता.शिगेला पोहचली आहे.

एकूणच, १९ प्रभागांत २८७ नामनिर्देशन पत्रांची विक्री आणि २५० उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने जळगाव महापालिका निवडणूक आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. आज  उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने खऱ्या अर्थाने निवडणूक रणधुमाळीला वेग येणार असून याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button