जळगांव जिल्हापोलीस

जळगावात विशेष नाकाबंदी मोहीम; २१०० हून अधिक वाहनांची तपासणी

२.३८ लाखांचा दंड वसूल; वाहतूक नियमभंगांवर कडक कारवाई

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते रात्री १०.३० या वेळेत जिल्हाभर ही मोहीम पार पडली.

या मोहिमेत जिल्ह्यातील महत्त्वाच्या ५९ ठिकाणी नाकाबंदी करून ४८ अधिकारी आणि २१६ अंमलदारांनी संयुक्तपणे कडक तपासणी केली. दरम्यान सुमारे २१०० ते २२०० वाहनांची तपासणी करण्यात आली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करत मोटार वाहन कायद्यांतर्गत ३७४ प्रकरणे नोंदवण्यात आली असून, एकूण २ लाख ३८ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ५ चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

फक्त वाहतूक नियमांपुरतीच कारवाई न ठेवता सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्या ४६ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या १३ जणांविरुद्ध १५ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

ही कारवाई जळगाव शहरातील एमआयडीसी, शनिपेठ, जिल्हापेठ, रामानंद नगर तसेच भुसावळ, रावेर, चोपडा, चाळीसगाव आणि पाचोरा या भागांत मोठ्या प्रमाणावर करण्यात आली.

या मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button