जळगांव जिल्हासामाजिक

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्ष पदी संध्या अश्विन कांकरिया; वार्षिक सभेत अशोक जैन यांनी केली घोषणा

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. १२ मे – श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ, जळगाव यांच्या वार्षिक सभेचे आयोजन जैन हिल्स येथे करण्यात आले होते. सभेची सुरुवात शासनपती भगवान महावीर स्वामीजी, प. पू. आचार्य सम्राट आनंदऋषीजी म. सा., वर्तमान आचार्य शिवमुनिजी म. सा. तसेच युवाचार्य प्रवर प .पू. महेंद्रऋषीजी म. सा. यांना वंदन करून आणि सामूहिक नवकार महामंत्र पठणाने झाली.सभेच्या प्रारंभी देवलोकगमन झालेल्या महासाध्वी वाणीभूषण प.पू. प्रीतिसुधाजी म.सा. तसेच महासाध्वी प.पू. पद्मश्री डॉ. चंदनाजी म.सा. यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

व्यासपीठावर जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर रमेशदादा जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, तारादेवी रेदासनी, ताराबाई डाकलिया, ज्योती अशोक जैन, दिलीप चोपडा, अनिल कोठारी, शांतीलाल बिनायक्या, नंदलाल गादिया उपस्थित होते.

सभेत नवीन अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करण्यात आली. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्ष पदी एकमताने संध्या अश्विन कांकरिया यांची अध्यक्षा म्हणून निवड केल्याची अशोक जैन यांनी  घोषणा केली.

कार्यकारिणीत शांतीलाल बिनायक्या, नगरसेवक अमर जैन, संजीव मेहर, नंदलाल गादिया, सुनील ललवाणी, संदीप रेदासनी, रूपेश लुंकड, प्रवीण पगारिया, राजेंद्र पारख, दिनेश डाकलिया, अतुल जैन, महेंद्र लोढा, जितेंद्र जांगडा, नरेंद्र सांडेचा, नरेंद्र कोठारी, दिनेश बोरा, नरेंद्र बंब, अजित कोठारी, सुनीता डाकलिया, डॉ. सोनाली जैन, सीए तेजल संघवी, तृप्ती रायसोनी, संगीता पारख, स्वीटी देसर्डा, अनिता कांकरिया, प्रदीप श्रीश्रीमाळ, बाबूशेठ श्रीश्रीमाळ, प्रवीण धाडीवाल, अनिल सिसोदिया, प्रियेश छाजेड यांचा समावेश आहे. संध्या कांकरिया यांनी मागील वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा सांगत अशोक जैन, प्रदीप रायसोनी यांच्या वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. श्रमण संघाच्या नियमावलीचे वाचन दिलीप चोपडा यांनी केले. विभाग प्रमुखांच्या कार्याची माहिती, भविष्यातील रणनीती याविषयी रमण छाजेड यांनी मनोगत व्यक्त केले. श्रमण संघ सदस्य डिरेक्टरीबाबतची माहिती जितेंद्र कोठारी यांनी माहिती केली.

संघटनात्मक एकता महत्त्वाची – अशोक जैन

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अशोक जैन म्हणाले की, समाजातील सर्व सदस्यांनी एकजुटीने धर्मसेवा, संतसेवा आणि संघसेवेसाठी सदैव पुढाकार घेतला पाहिजे. पदाची अपेक्षा न ठेवता समर्पणभावाने सेवा करणे आवश्यक आहे. मागील कार्यकाळातील उपक्रमांकडे पाहिले असता एकतेच्या बळावर किती सुंदर कार्य घडू शकते, हे स्पष्ट होते. ही संघटनात्मक एकता कायम राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. “संघ, समाज, संप्रदाय, गच्छ आणि संतवृंदांविषयी बेजबाबदार वक्तव्य करू नये. सार्वजनिकरित्या कोणी असे करत असल्यास त्याला त्याच ठिकाणी रोखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तेच खरे संघहित आणि संघसेवा ठरेल.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button