जळगावअध्यात्मिकधार्मिक

अधिक महिन्यानिमित्त आयोजित विष्णुसहस्र नामाची गोपाळकाला व 56 भोग ने सांगता

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : सुरभी व श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर महिला मंडळातर्फे अधिक महिन्यानिमित्त दि 17 मे पासून सुरु असलेल्या विष्णुसहस्र नामाची गोपाळ काला व ५६ भोग ने श्री सिद्धिविनायक मंदिर, रेल्वे कॉलनी येथे सांगता करण्यात आली करण्यात आली.

गोपाळकाला करिता सर्व महिलांनी वेगवेगळे खाद्य पदार्थ आणून एकत्र गोपाळकाला करण्यात आला.15  ला सोमवारी शेवटच्या दिवशी श्री विष्णूंना 56 भोग लावण्यात आले. सुरवातीला ओम नमो भगवते वासुदेवाय चे 108 वेळा नामस्मरण. नंतर विष्णुसहस्र नाम पठण , व उपस्थित सर्व महिलांचा हस्ते आरती करण्यात आली

कार्यक्रमाचे नियोजन सुरभी अध्यक्षा स्वाती कुळकर्णी, लताताई झवर, नीलिमा नाईक व स्वाती झवर ह्यांनी केले. 56 भोग सजावट सुनीता सातपुते, मंगला अमृतकर, विद्या चौधरी, राजश्री बोरोले, राखी झवर ह्यांनी केली. अश्विनी जोशी व कुंदाताई जोशी ह्यांनी गोपाळ कृष्णाचे भजन म्हटले.

ज्योती भोकरडोळे, सुनीता साळुंखे, ज्योती तलवारे, उर्मिला खडके, शैलजा नेमाडे, मंदाकिनी पाटील, चारुलता जोशी, शुभदा राव, लता सोनवणे, रंजना पांडे , सुवर्णा मते, पूनम जोशी ह्यांनी सहकार्य केले.

ह्यावेळी उषा पाटील, वृषाली सूर्यवंशी, रंजना शूर, ललिता टिपरे, रागिणी तारकस , रेवती शेंदुर्णीकर, कमलताइ बोरोले, वत्सला चौधरी, सुरडकर तसेच सुरभीच्या व रेल्वेकॉलनी परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.भजन व गरब्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अधिक महिन्यानिमित्त आयोजित विष्णुसहस्र नाम पठण कार्यक्रमात दररोज 40 ते 45 महिलांनी सहभाग घेतला.आभार स्वाती कुळकर्णी ह्यांनी मानले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button