जळगांव जिल्हाअध्यात्मिकसांस्कृतिक

आषाढी वारीच्या निमित्ताने शुक्रवारी जळगावकरांसाठी परिवर्तन निर्मित ‘पालखी’ नाटकाचा विशेष प्रयोग !

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि.२३  : आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त जळगावकरांना वारकरी परंपरेचा भावस्पर्शी अनुभव देणारा परिवर्तन निर्मित ‘पालखी’ या गाजलेल्या नाटकाचा विशेष प्रयोग शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी रात्री ८ वा. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे सादर होणार आहे.

साहित्यिक दि. बा. मोकाशी यांच्या कादंबरीवर आधारित या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन शंभू पाटील यांनी केले आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती, समता, माणुसकी आणि वारीचे आध्यात्मिक सौंदर्य प्रभावी नाट्यमाध्यमातून उलगडणारे हे नाटक प्रेक्षकांना भावविश्वात घेऊन जाते.

‘पालखी’ या नाटकाचे प्रयोग यापूर्वी मुंबई, कलकत्ता तसेच राज्यातील विविध शहरांमध्ये यशस्वीरीत्या सादर झाले असून, प्रेक्षक आणि समीक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आता आषाढी वारीच्या निमित्ताने जळगावकरांनाही हा अविस्मरणीय नाट्यअनुभव घेता यावा, या उद्देशाने अनिशभाई शाह, अनिलभाई कांकरिया, किरण बच्छाव, नंदलाल गादिया, अमर कुकरेजा, छबीराज राणे व नारायण बाविस्कर यांच्या संकल्पनेतून हा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

सुमारे ४५ कलावंतांचा सहभाग असलेल्या या भव्य नाट्यप्रयोगात वारकरी परंपरेचे वैभव, विठ्ठलभक्तीची अनुभूती, अभंग, कीर्तन आणि भावविश्व यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. परिवर्तन निर्मित हा नाट्यप्रयोग भक्ती, संस्कृती आणि रंगभूमी यांचे अनोखे दर्शन घडवणारा ठरतो.

या नाटकात मंजुषा भिडे, वसंत गायकवाड, नारायण बाविस्कर, होरीलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, अक्षय नेहे, नेहा पवार, श्वेतांबरी गरुड, हर्षल पाटील यांच्यासह एकूण सुमारे ४५ कलाकार भूमिका साकारत आहेत.

हा प्रयोग जळगावकरांसाठी खुला असून प्रवेशिका आहेत. त्यासाठी अक्षय नेहे (77982 66875 ) यांच्याशी संपर्क साधावा. आषाढी वारीच्या पावन वातावरणात भक्ती, संस्कृती आणि नाट्यकलेचा अद्वितीय संगम अनुभवण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परिवर्तन संस्थेच्यावतीने डॉ. किशोर पवार, डॉ. मनोज पाटील, लीना लेले, सुनील बारी, आदींनी केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button