जळगावआरोग्यक्रीडा

जैन हिल्सवर अनोखी ‘Morning Journey’ मध्ये ध्यान, संगीत, फ्री-फ्लो डान्सचा जळगावकरांनी घेतला आनंद!

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’

| लोकमाध्यम न्युज | जळगाव, दि. २७ प्रतिनिधी : जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसरात उगवत्या सूर्याच्या साक्षीने जळगावकरांनी धावपळीच्या जीवनशैलीतून काही क्षण स्वतःसाठी काढत शरीर आणि मनाला नवचैतन्य देणारा ‘Sunrise & Surrender – The Morning Journey’ हा अनोखा उपक्रमाची अनुभूती घेतली. ‘The Unplug Project’ च्या माध्यमातून केवळ निसर्गभ्रमंती, ध्यान, लाइव्ह म्युझिक, डान्स त्यानंतर उत्तम खाद्यसंस्कृती यांचा अनुभव देणारी सकाळची खास जर्नी प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरली.

निसर्गरम्य परिसरात Scenic Run आणि Nature Walk सोबत ध्यान, लाइव्ह म्युझिक आणि फ्री-फ्लो डान्सचा आनंद सहभागींना घेतला. ‘Not just a run. Not just a party.’ या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश शरीरासोबत मनालाही ताजेतवाने करणे हा होता. ‘Move, Breathe, Dance, Belong’ या भावनेतून जळगावकरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला होता. यामध्ये कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त आदित्य जिवने, जिल्हा परिषदेच्या सीईओ करिश्मा नायर, उपवनसंरक्षक सौरेश सहाय, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सौ. निशा जैन, शोभना अजित जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉ. भावना जैन, क्रेडाईचे राज्यउपाध्यक्ष अनिश शहा, यामिनी शहा, डॉ. जयवंत नागूलकर, डॉ. कल्याणी नागूलकर, प्रेम कोगटा, अथांग जैन, अंबिका जैन, अभेद्य जैन, आंचल जैन यांच्यासह मान्यवरांनी सहभाग घेतला.

‘Music पासून Meditation पर्यंतची अनोखी रंगत..
अहमदाबाद येथील नामवंत आर्टिस्ट पारस दलाल यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या सादरीकरणामुळे सकाळच्या या अनुभवाला संगीत आणि मनोरंजनाची वेगळी रंगत मिळाली. आजची सकाळ जळगावकरांसाठी ‘Run पासून Relaxation पर्यंत’ आणि ‘Music पासून Meditation पर्यंत’ चा नवा अनुभव देऊन गेली. श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या श्रद्धाज्योत या श्रद्धास्थळापासून मॉर्निग जर्नीला सुरवात झाली. येथून श्रद्धाधाम परिसरात बोटींमध्ये तबला वादन, क्लासीकल पियानो वादन सह मंगोलियन साऊंडच्या माध्यमातून निसर्गाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला. ध्यान योगातून मन:शांतीचा प्रयत्न केला गेला.

अंबिका जैन यांनी सर्वांचे आभार मानले. तर डॉ. अश्विन झाला यांनी परिसराची माहिती दिली. यशस्वीतेसाठी अंबिका जैन यांच्यासह, जयंतिका आणि सनम, जगदीश चावला यांनी विशेष परिश्रम घेतले.

जळगावकरांना ‘रन’पलीकडचा अनुभव!

‘फक्त धावणे नाही, फक्त पार्टीही नाही’ या संकल्पनेतून साकारलेल्या उपक्रमाने व्यायाम, निसर्ग, संगीत आणि नृत्याचा अनोखा मिलाफ घडवला. शरीरासोबत मनालाही ताजेतवाने करणाऱ्या या उपक्रमातून ‘चला, हालचाल करूया, श्वास घेऊया, नाचूया आणि एकत्र येऊया’ हा संदेश देण्यात आला. अंबिका जैन, जयंतिका आणि सनम यांच्या पुढाकारातून जळगावकरांना पहिल्यांदाच अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमाची अनुभूती मिळाली.

 जळगावकरांना ‘रन’ पलिकडचा अनुभव घडविणाऱ्या अंबिका जैन, जयंतिका आणि सनम.

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button