महागाई, बेरोजगारी, हमीभाव यांच्यासाठी मशाल हाच पर्याय – करणदादा पाटील
अमळनेर तालुक्यात विविध ठिकाणी कॉर्नर सभा
अमळनेर दि.४ मे २०२४ : महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव असे सगळेच प्रश्न सोडविण्यात भाजपा अपयशी ठरली आहे. त्यानंतरही तुम्ही त्यांना अनेकवेळा संधी दिली. आता परिवर्तनाची गरज असून एकवेळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संधी द्या, असे आवाहन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी केले.
करणदादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त शुक्रवार, दि. ३ रोजी अमळनेर तालुक्यातील • लोणचारम, लोण खु/बु, लोण सीम, भरवस, झाडी, सबगव्हाण, चौबारी, जैतपीर, गलवाडे बु/खु, मंगरुळ आणि जानवे येथे प्रचार रॅली काढण्यात आली तर मंगरुळ आणि जानवे येथे कॉर्नर सभा घेण्यात आल्या. या कॉर्नर सभेप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या ॲड. ललिता पाटील, मंगरुळचे सरपंच समाधान पारधी, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, खा. शि. मंडळाचे चेअरमन डॉ. अनिल शिंदे, काँग्रेसच्या किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, ज्येष्ठ नागरिक भाईदास पाटील, वाल्मीक पाटील, ग्रा. पं. सदस्य मुकेश भदाने, अशोक पाटील, सचिन थाठे आदी उपस्थित होते.
करणदादा पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, यांच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. काँग्रेसच्या काळात विकासोकडून शून्य टक्के व्याजदरावर मिळणाऱ्या कर्जावर आता शेतकऱ्यांना १८ जीएसटी भरावा लागणार आहे. ६ ते ७ रुपये प्रति लिटर कमी दराने दूध फेडरेशनला द्यावे लागत आहे. खा. उन्मेषदादा पाटील यांनी आवाज उठविल्यानंतर दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ झाली. मात्र, १५ तारखेनंतर ते २ रुपयांचे ४ रुपये वसूल केल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.सभेत, खा. शि. मंडळाचे चेअरमन डॉ. अनिल शिंदे, काँग्रेसच्या किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, सचिन थाठे यांसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून ‘मशाल’ चिन्हा समोरील बटन दाबून करणदादा पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन केले.