जामनेर तालुक्यातील मतदारांशी श्रीराम पाटील यांनी साधला सुसंवाद
जामनेर दि.२८ : रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी जामनेर तालुक्यातील प्रचार दौऱ्यात गाडेगाव, नेरी बुद्रुक व नेरी दिगर येथील ग्रामस्थांशी तसेच मतदारांच्या भेट घेत संवाद साधला.
यावेळी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डी के पाटील, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष दीपकसिंग राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नेते प्रमोद नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, ऍड . ज्ञानेश्वर बोरसे, जामनेर तालुका प्रमुख शिवसेना (उबाठा), किशोर खोडपे, अशोक कोळी, निलेश कोळपे, सागर कुमावत, आशिष दामोदर, प्रशांत पाटील, विश्वजीत पाटील, रुपेश पाटील, राजेश पाटील, विवेक कुमावत, ऋषिकेश पाटील, माजी सरपंच दिनेश पाटील, शुभम राजपूत, अमोल पाटील, गणेश पाटील, चंद्रकांत बाविस्कर, कुणाल पाटील, देवेंद्र पाटील, नितीन पाटील यांच्यासह गाडेगाव,नेरी बुद्रुक, नेरी दिगर, पळासखेडा मिराचे येथील ग्रामस्थ तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते