रोटरी क्लब आयोजित व्हिजन विकासाला कार्यक्रमात शिवसेना (उबाठा) उमेदवार करण पवार यांची दांडी
मतदार संघात रोजगार निर्मितीसह उद्योग धंद्यांना चालना देण्याचा भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांनी मांडले विकासाचे व्हिजन
जळगाव दि.५ मे २०२४ : जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपा व शिवसेना( उबाठा ) पक्षाच्या उमेदवारांचे विकासाचे व्हिजन जाणून घेण्यासाठी रोटरी क्लब (वेस्ट) ने कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमात महायुतीच्या भाजपाचे उमेदवार स्मिताताई वाघ यांनी मतदार संघातील विकासासाठी नवीन प्रकल्प आणण्यासह शेतकरी,कामगार,महिला व युवकांसाठी कार्यरत राहण्याचा संकल्प बोलून दाखविला.
मात्र, या कार्यक्रमाला शिवसेना (उबाठा)चे उमेदवार करण पवार यांनी दांडी मारल्याने मतदार संघासाठी त्यांची काय भूमिका आहे हे जळगावकरांना समजू शकले नाही. यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे दिसून आले. करण पवार यांच्या वतीने संजय सावंत यांनी भूमिका मांडली.
भाजपा व शिवसेना ( उबाठा) या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी रोटरी क्लबने उमेदवारांच्या मनातील व्हिजन विकासाचे जाणून घेण्यासाठी कार्यक्रम आयोजित केल्याने नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु, करण पवार यांनी स्वतः भूमिका न मांडता कार्यक्रमाला दांडी मारून संजय सावंत यांना प्रतिनिधी म्हणून पाठविल्याने नागरिकांचा अपेक्षाभंग झाला.
मात्र, भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांनी मतदार संघात रोजगार निर्मिती साठी उद्योग व्यवसायास चालना देदेण्यासाठी मोठे प्रकल्प आणण्यास, सिंचन,शेतकऱ्याच्या शेत मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्राधान्य देण्याचे अभ्यासपूर्ण व्हिजन मांडले.