सुप्रीम कॉलनी परिसरातील समस्या सोडविणेसाठी मनसे तर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा
अमृत योजनेचे पाणी, रस्ते गटारी व स्ट्रीट लाईटचे कामे त्वरित करण्याची मागणी
जळगांव दि २१: सुप्रीम कॉलनी परिसरातील विविध समस्या सोडविणेसाठी मनसे तर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
जळगाव शहरातील दुर्गम भाग म्हणून ओळखला जाणारा सुप्रीम कॉलनी परिसर त्यातील काही उपभाग म्हणजे ममता बेकरी, पोलीस कॉलनी, प्रेमाबाई शाळा हा परिसर अनेक गेल्या 22 ते 25 वर्षापासून त्या ठिकाणी स्थित असून, आज पर्यंत त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, गटारी, रस्ते स्ट्रीट लाईट, अशा कोणत्याच प्रकारची सुविधा नाही. महानगरपालिकेच्या कर त्या घरांना लागत असून कोणत्याच प्रकारची सुविधा तेथील रहिवाशांना मिळत नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या वर्षापासून सतत आंदोलने निवेदने जळगाव महानगरपालिका यांना दिलेले आहे, परंतु ठोस अशी भूमिका प्रशासनाने घेतलेली नसून या निवेदनाद्वारे सुचित करण्यात येतेकी, अमृत योजना ही गेल्या पाच ते सहा वर्षापासून काम सुरु झाले आहे, अशा या महानगरपालिकेच्या ऐतिहासिक योजना अजून पर्यंत पूर्ण झालेली नाही, त्यासाठी नागरिकांकडून पैसे घेऊन सुद्धा त्यांच्या घरापर्यंत अमृत योजनेचा पाणी पोहचलेलं नाही, काही दिवसात उन्हाळ्याची परिस्थिती जळगाव मध्ये भयंकर राहील, आणि अशा परिस्थितीमध्ये जगावकरांना पाण्याचा त्रास सहन करावा लागतो, त्यासंदर्भात महाराष्ट नवनिर्माण सेना जळगाव तर्फे. निवेदन देण्यात येते की अमृत योजनेवर लवकरात लवकर उपाययोजना करून तिथल्या स्थानिक लोकांपर्यंत अमृत योजनेचा पाणी पोचलं पाहिजे, तेथील रस्ते गटारी व स्ट्रीट लाईटचे कामे त्वरित झाले पाहिजे, येत्या आठ दिवसात त्या कामाला सुरुवात न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे तीव्र आंदोलन व रास्ता रोको करण्यात येईल.असा इशारा निवेदनात द्वारे देण्यात आला आहे.निवेदन देते वेळी मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे ,विनोद शिंदे,उपमहनगराध्यक्ष आशिष सपकाळे, राजेंद्र निकम, खुशाल ठाकुर ,श्रीकृष्ण मेंगडे ,सीमा गोसावी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.