राजकारण

तुतारी हे नवीन पक्ष चिन्ह मिळाल्या बद्दल शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जल्लोष

जळगांव दि .२३ : केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला प्रलंबित असलेले तुतारी हे नवीन पक्ष चिन्ह म्हणून देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव व घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्या नंतर शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव निवडणूक आयोगातर्फे देण्यात आले होते तसेच काल दिनांक २२ रोजी निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला देण्यात आलेहे चिन्ह शरद पवार गटाला देण्यात आले  आज दिनांक २३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष कार्याल आकाशवाणी चौक येथे नवीन पक्ष मिळाल्या बद्दल तुतारी चे औक्षण करून व तुतारी वाजवत,पेढे वाटप करीत, फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

या वेळेस शरद पवार साहेब तुम आगे बढो हम तुमारे साथ है, देश का नेता कैसा हो शरद पवार साहेब जैसा हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा विजय असो अश्या अनेक घोषणा देण्यात आल्या
यावेळी नविन पक्ष चिन्ह तुतारी ची पुजा ग्रामीण जिल्हाअघ्यक्ष ॲड. रविंद्र पाटील व महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते पुजा करुन तुतारी वाजवून जल्लोष करण्यात आला
यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते पेढे वाटप करण्यात आले
यावेळी, वाय एस महाजन ,रिंकू चौधरी , इब्राहिम तडवी , रमेश पाटील , उमेश पाटील , प्रतिभा शिरसाट , अशोक सोनवणे , मजहर पठाण , रमेश बारे , राजु मोरे , सुनिल माळी , किरण राजपूत , ॲड.राजेश गोयर , हितेश जावळे , एस डी पाटील , भाऊसाहेब इगळे , ॲड. किरण शिंदे , सुहास चौधरी , चेतन पवार , समाधान धनगर , संजय चव्हाण , संजय जाधव , रफिक शाह , आयाज शाह , चंद्रकांत चौधरी , बशीर शाह , मतिन सैय्यद ,बबलू आव्हाड , गणेश सोनार , रशीद पिंजारी , रुफभाई शाह इतर पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button