
लोकमाध्यम न्युज | जळगाव ७ ऑक्टोबर २०२४ |
६ ऑक्टोबर २०२४ रविवार रोजी स्व.कुंदन (समाभाऊ) चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री समर्थ मित्र मंडळ, जोशी पेठ, जळगाव या मंडळाकडून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. मंडळाच्या सर्व कार्यकर्ते तसेच महिला सभासदांनी खूप परिश्रम घेत जवळजवळ 51 ते 55 रक्तदात्यांनी स्व इच्छेने रक्तदान करून रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे याचे एक चांगले उदाहरण समाजासमोर सादर केले.
रक्त संकलन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद या संस्थेचे सहकार्य मंडळाला लाभले. तसेच ललित (भैया) भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शना प्रमाणे कार्यक्रम पार पडला. श्री समर्थ मित्र मंडळाकडून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासाठी मंडळाचे अध्यक्ष भूषण वाघे, उपाध्यक्ष,शुभम न्हावी, सदस्य चेतन, मराठे,जयेश मराठे, प्रतीक माळी, प्रसाद चौधरी, किरण मराठे, योगेश पाटील, योगेश मराठे, आशिष चौधरी,सिद्धेश चौधरी,तुषार सोनार, सार्थक पाटील,अनिकेत दुसाने,स्वप्निल जगताप, विकी जगताप,पंकज शर्मा,आनंद शर्मा,पियुष शर्मा, गजेंद्र सोनार महिला सदस्य इंदुबाई मराठे,नायरा चौधरी, निशा सोनार,भाग्यश्री सोनार,चैताली बारी,अर्चना माळी या सर्वांनी रक्तदानाबद्दल जनजागृती करून परिश्रम घेतले