लोकमाध्यम न्युज | जळगाव ८ सप्टेंबर २०२४ |
पिप्राळा विविध कार्यकारी सह.सोसायटी व के.पी.फाउंडेशन व कुलभूषण पाटील मित्र परिवार जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार ८ रोजी कृषी भूषण पुरस्कार २०२४ चे कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले होते. या मध्ये पिप्राळा व सावखेडा परिसरातील शेतकऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या मध्ये केळी, तूर,ज्वारी,दूध,फुल,फळ इ विविध शेती पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होता.
यावेळी जळगाव जिल्हा बॅंकचे चेअरमन संजय पवार,माजी.उपमहापौर .कुलभूषण पाटील,माजी.नगरसेवक अमर जैन,कृषी अधिकारी .वंदना ठाकरे, कृषी अधिकारी जीवराज आमले, पिंप्राळा वि.का. सोसायटीचे चेअरमन पंकज सोमाणी, व्हाईस चेअरमन .राहुल पाटील, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
प्रास्ताविकात कार्यक्रमाचे आयोजक कुलभूषण पाटील यांनी कार्यक्रम आयोजना ची व संस्थेची सविस्तर माहिती दिली
उपस्थित पुरस्कारार्थी शेतकऱ्यांना प्रमुख पाहुणे जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या हस्ते सत्कार व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
याप्रसंगी पुरस्कारार्थी शेतकऱ्यांनी कृषी भूषण पुरस्कार २०२४ कार्यक्रमाचे आयोजक माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे कौतुक करत आभार मानले.
आपल्या भाषणात संजय पवार यांनी कुलभूषण पाटील व कार्यक्रम आयोजक संस्था पदाधिकाऱ्यांचे कौतुक करतांना आगामी विधानसभा निवडणुकीतील आमदारकीचे इच्छुक उमेदवार म्हणून कुलभूषण पाटील यांचा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्याचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि तत्कालीन एस काँग्रेसचे अध्यक्ष स्व.मुरलीधर अण्णा पवार,जिल्हा बँकेचे चेअरमन स्व.प्रल्हाद राव पाटील यांच्या सहकार व राजकीय क्षेत्रातील कामगिरी विषयक अनेक दाखले दिले.
कृषी अधिकारी वंदना ठाकरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शेतकरी गौरव कार्यक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमास संभाजी ब्रिगेड महानगर प्रमुख संदीप पाटील,युवासेना उपमहानगर युवा अधिकारी राहुल शिंदे,.संजय सोमाणी,सर्व संचालक मंडळ,पिप्राळा आणि सावखेडा परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.