वधू वरासह वऱ्हाडी मंडळींनी घेतली मतदानाची शपथ
जळगाव दि. १३ : शनिवार दि. १३ एप्रिल रोजी
म्हसावद ता.जि. जळगांव येथे लग्नसमारंभात मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी वधू वरासह उपस्थित.वधू मंडळींनी मतदानाची शपथ घेतली.
म्हसावद येथील रमेश आनंदा चिंचोरे यांचे सुपुत्र चि.जिग्नेश आणि मोहन शंकर कंखरे यांची सुकन्या चि सौ.कां.चिन्मयी यांचा शुभविवाह म्हसावद, ता.जि.जळगाव येथे संपन्न झाला. या विवाह प्रसंगी स्वीप उपक्रमांतर्गत मतदानाची शपथ वाचन थेपडे विद्यालय म्हसावद तर्फे योगराज चिंचोरे यांनी केले. त्यांच्या सोबत वर-वधू ,उपस्थित सर्व वर्हाडी मंडळी,ग्रामस्थ यांनी शपथ घेऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचा निश्चय केला.
या प्रसंगी थेपडे विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. डी. चौधरी, उपमुख्याध्यापक जी. डी. बच्छाव, सी. एम. राजपूत, पी. पी. मगरे, क्रिडा शिक्षक राहूल गिरासे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार उपस्थित होते.