रोझलॅन्ड प्राथमिक विद्या मंदिर तर्फे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
विद्यार्थ्यांनी केले सण उत्सवांवर गीत नृत्य सादर
जळगाव दि २२ – जळगांव येथील न्यू एरा एज्युकेशन सोसायटी संचलित रोझलॅन्ड प्राथमिक विदया मंदिर जळगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरा करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रोझलॅन्ड प्राथमिक विद्या मंदिर च्या मुखाध्यापिका श्वंदना सोले यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून रोझलॅन्ड इंग्लिश मिडिअमच्या मुख्याध्यापिका सौ . सिता तिवारी आणि डाॅ. हर्षा खडके उपस्थित होत्या .
विद्यार्थ्यांनी याप्रसंगी वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाची संकल्पना ही सण उत्सव यावर आधारित होती सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर केले .
गणेश वंदना, देशभक्तीपर गीत, गोंधळगीत, महाराष्ट्राचे दैवत छत्रपती, रक्षाबंधन, ही मायभूमी – जन्मभूमी, श्रीकृष्ण जयंती, होळी, दिवाळी या सण – उत्सवांवर आधारित गीत नृत्य सादर केले . याप्रसंगी विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोझलॅन्ड प्राथमिक विद्या मंदिर व रोझलॅण्ड इंग्लिश मेडिअम हायस्कूल या दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणली कदम यांनी तर आभार प्रदर्शन राजेश सपकाळे यांनी केले.
मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला .