नरेंद्रजी मोदी – एक व्यापक दृष्टिकोण
लोकमाध्यम न्युज | जळगाव २५ ऑगस्ट २०२४ |
नरेंद्रजी मोदी – एक व्यापक दृष्टिकोण
नरेंद्रजी मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरात राज्यातील एका छोट्याशा गावात इतर मागासवर्गीय कुटुंबात झाला. अशा कुटुंबात जेथे जन्मापासूनच कष्ट होते आणि एक रुपया सुद्धा अतिरिक्त खर्च करण्याची क्षमता नव्हती, सामान्य माणसांचे दु:ख सहज कळण्यासारखे होते, मात्र दूरदृष्टिकोण, राष्ट्रीय एकात्मता, समाज, पर्यावरण याविषयीचे धडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांना अंगीकृत करता आले. शिक्षण म्हणजे त्यांनी राज्यशास्त्रात एम.ए. केलेले आहे.
9 जून 2024 रोजी सलग तिसर्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची त्यांना शपथ देण्यात आली, ती केवळ त्यांच्या दूरदृष्टिकोण, आर्थिक प्रगती, राष्ट्रीय सुरक्षा, समाजाभिमुख कार्य, पर्यावरण आदी विषयांना भारतीय जनतेने स्वीकारले आणि जगातील अनेक राष्ट्रांनी त्यांच्या या कार्यपद्धती व दृष्टिकोणाचे कौतुक केले म्हणूनच. त्यांनी भारतात नवनवीन तंत्रज्ञान, दळण-वळण, आंतरराष्ट्रीय नीती, शांततेच्या दृष्टिकोणातून पावले उचलली. यामुळे ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे साध्य होऊन कोट्यावधी भारतीयांचा दृढविश्वास नरेंद्रजी मोदी यांच्यावर झाला.
सर्व समावेशक प्रगती व प्रबोधन तसेच भ्रष्टाचारमुक्त प्रशासन ही खरी आपल्या भारत देशाच्या पंतप्रधानांची महत्त्वकांक्षा. नीती आयोगाने दिलेल्या अहवालानुसार 2005-06 च्या तुलनेत 25 कोटी जनता ही गत 9 वर्षात दारिद्रय रेषेतून बाहेर निघाली. सुमारे 50 कोटी भारतीयांनी ‘आयुष्यमान भारत’ या संकल्पनेचा उपयोग करीत आरोग्यसेवेचा उपभोग घेतला आणि याच महत्त्वकांक्षी योजनेची जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा दखल घेतली. गत 10 वर्षात ‘प्रधानमंत्री जन-धन योजना’ यामध्ये 51 कोटी बँक खाती उघडण्यात आली. ‘जन सुरक्षा योजना’ हे वीमा आणि पेन्शन यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. त्यामधील पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा उपयोग हा प्रभावी आहे. ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ या अंतर्गत 10 कोटीहून अधिक महिलांना त्याचा उपयोग झाला. 18 हजार हून अधिक खेड्यांना स्वातंत्र्यकाळानंतर प्रथमच वीज पोहोचली. ‘पंतप्रधान आवास योजना’ या अंतर्गत 4.2 कोटी लोकांना याचा लाभ झाला आणि पहिल्या कॅबिनेट बैठकीत ग्रामीण व शहरी भागात 3 कोटी लोकांना त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी उद्दिष्ट ठरविण्यात आले. 24 फेब्रुवारी 2019 रोजी ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी’ची घोषणा झाली. 5 एकर पर्यंत असलेल्या अल्प भूधारक शेतकर्यांची ही अट काढून टाकण्यात आली आणि या सातत्यपूर्ण ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी’ योजनेंतर्गत 9.2 कोटी शेतकर्यांना याचा लाभ मिळाला. जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचे उत्तम नियोजन करण्यात आले. पूज्य महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2014 रोजी ‘स्वच्छ भारत मिशन’ची घोषणा झाली. 2014 पूर्वी 38 टक्के असलेले सांडपाणी व्यवस्थापन हे 2019 सालापर्यंत 100 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे कौतुक करीत सुमारे 3 लाख लोकांचे जीव वाचविल्याचा अभिप्राय सुद्धा नोंदविला.
युवक-युवतींना डोळ्यासमोर ठेवून भारताच्या प्रगतीसाठी ‘उडे देश का आम नागरिक’ या माध्यमातून रेल्वे, हवाई वाहतूक, जल वाहतूक, हायवे या सर्वांत पर्यावरणपूरक आणि सर्वोत्तम काम झाले. ‘मेक इन इंडिया’ मुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे मानांकन 2014 रोजी 142 व्या स्थानावर होते, मात्र ते 2019 मध्ये 63 व्या स्थानावर आले. यामुळेच ‘व्यापार करणे झाले सोपे’ हे सिद्ध होते. 2017 मध्ये ‘एक राष्ट्र एक टॅक्स’ या अंतर्गत जीएसटीची प्रभावी अंमलबजावणी झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सरदार वल्लभभाई पटेल यांना मानवंदना देत ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ च्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा पुतळा निर्माण करीत ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ठरला. पर्यावरणावर विशेष अभ्यास करीत आणि आपल्या देशाच्या सादरीकरणामुळे 2015 साली पॅरिस येथे ‘सीओपी 21’ या परिषदेत नरेंद्रजी मोदी यांनी मोलाची भूमिका बजावली. सोलर निर्मितीमध्येही भारत अग्रेसर ठरला. युनायटेड नेशन ने ‘चॅम्पियन्स ऑफ अर्थ’ याद्वारे आपल्या भारत देशाचा सन्मान केला. मोदीजींनी आपत्ती व्यवस्थापनाचे उत्कृष्ट धडे जगासमोर घालून दिलेत. जगातील सऊदी अरब, पेलेस्टीन, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिरात, मालदीव, बहरीन, भूतान, न्यु गुनिआ, फ्रांस, फिजी, इजिप्त, ग्रीस यासह अनेक देशांनी मोदीजींच्या माध्यमातून भारताचे सन्मान केले. ‘बिल व मिलेंडा गेट्स फाऊंडेशन’, ‘ग्लोबल एनर्जी अॅण्ड एनव्हायरमेंट’, ‘कॅम्ब्रीज एनर्जी रिसर्च असोसिएट’ यांनी सुद्धा मोदींजींचे सन्मान केले. 21 जून ला ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ ची सुरुवात मोदीजींनी केली, त्याची फलश्रुती म्हणजे युनायटेड नेशन्ससह जगातील 177 देश आज ‘योग’ करावयास प्रवृत्त झालेत व आनंदाने ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरे करीत आहेत.
केळीसारखे मधुर, कापसासारखे मऊ व शुभ्र तसेच कवयित्री बहिणाबाई, बालकवी ठोंबरे, पू.सानेगुरुजी व पद्मश्री ना.धों.महानोर यांची कर्मभूमी असलेल्या खान्देशात म्हणजेच खान्देशातील जळगावात व्यापक दृष्टिकोण असणार्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे स्वागत करताना तमाम खान्देशवासीयांच्यावतीने आम्हाला मनापासून आनंद होत आहे.
सुरेश दामु भोळे (राजूमामा)
आमदार, जळगाव विधानसभा क्षेत्र, महाराष्ट्र राज्य