जळगावविधानसभा निवडणूक

शहरातील डॉक्टरांच्या समस्या सोडविण्याकरता कटिबद्ध ; डॉ.अनुज पाटील यांचे शहरातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना आश्वासन

लोकमाध्यम न्युज | जळगांव ७ नोव्हेंबर २०२४ |

जळगांव- शहरातील सर्व मान्यवर डॉक्टरांची बैठक आयएमए हॉल या ठिकाणी पार पडली. बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ. पाटील यांनी निवडणूक लढण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली व डॉक्टरांच्या येणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्यांचा समाधान करण्याकरता माझी उमेदवारी आहे असे आश्वासन दिले.

डॉ. अनुज पाटील असे म्हटले की,तुमच्या समस्या ऐकण्यासाठी, तुमच्या व्यथा समजून घेण्यासाठी मी, डॉ. अनुज पाटील, तुमच्यासमोर उभा आहे. आज डॉक्टरांवर संकटाचं सावट पसरलं आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले, रुग्णालयांवर होणारे हल्ले, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होणारा त्रास, महापालिका प्रशासनातील अग्निशमन दलातर्फे होणारा त्रास, शासनाच्या किचकट नियम व अटी यामुळे रुग्णालय चालवणे अतिशय जिकरीचे काम झाले आहे. परंतु, हे संकट आपण एकजुटीने पार करू शकतो, त्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज आहे व आपल्या हक्काचा प्रतिनिधी विधानसभेत गेला पाहिजे अशी आग्रही भूमिका ही डॉ. पाटील यांनी मांडली.

डॉक्टरांच्या समस्या विधानसभे मधे मांडण्यासाठी माझं वचन असेल आणि माझ्या प्रत्येक कृतीत तुमच्यासाठी दिलेला शब्द असेल. तुमच्या प्रत्येक व्यथा, तुमच्या समस्यांचा अंतिम निकाल लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याखाली एक नविन परिवर्तन आणण्याचा निर्धार मी केला आहे.

तुमच्या कष्टाचं मोल, तुमच्या सेवेला सलाम, आणि या लढाईला माझ्या पूर्ण ताकदीने साथ देणार आहे. चला, आता जळगावातील डॉक्टरांच्या स्वाभिमानासाठी उभे राहूयात. तुमचं असलेलं विश्वास मला बळ देईल आणि हा विश्वास तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान बनून परत येईल असेही
डॉ. अनुज पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले

एक नविन जळगाव,एक निर्धार डॉक्टरांसाठी..!

या घोषवाक्य प्रमाणे माझे प्रयत्न माझ्या व्यवसाय बंधू करता सतत असतील अशी काही डॉ. अनुज पाटील यांनी या प्रसंगी दिली.
या प्रसंगी आय एम ए चे अध्यक्ष डॉ.
सुनील गाजरे,सचिव डॉ अनिता भोळे,डॉ.अनिल पाटील,डॉ विलास भोळे,डॉ.स्नेहल फेगडे ,डॉ.सुनील नाहटा,डॉ.राजेश पाटील,डॉ.जितेंद्र कोल्हे,डॉ.सुदर्शन नवाल,डॉ.अजय सोनवणे,डॉ.अभिजित पाटील,डॉ.नरेंद्र भोळे,डॉ.लीना पाटील यांच्यासह शंभर डॉक्टर उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button