लोकमाध्यम न्युज | जळगांव दि.२८ जुलै २०२४ |
जळगाव महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार राजुमामा भोळे यांच्यावर आज केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे आज सायंकाळी ७.३० वाजता भाजपा कार्यालय जि.एम. फाउंडेशन येथे महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेण्यात आली सुनील महाजन यांना आता विधानसभेचे स्वप्न पडत आहेत,नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतःच्या प्रभागात स्वतःच्या पक्षाला मतदान देऊ शकले नसल्याने त्यांना वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याने त्यामुळे ते गलीच्छ राजकारण करीत आहेत.
याउलट जळगाव शहरातून आमच्या उमेदवाराला स्मिताताई वाघ यांना ६१ हजाराचा लीड दिला असून त्यांना याचा जोरदार धक्का बसला असून त्यांना तो पचवता आला नाही. त्यामुळे ते गलीच्छ राजकारण करीत आहे याउलट आम्ही गेल्या १० वर्षापासून जनतेच्या विकासाचे कार्य करीत असून सुनील महाजन यांच्याबद्दल जर सांगायचे म्हटले तर खुप काहीआहे कोणत्याही पदावर नसताना शासकीय विश्राम गृहांमध्ये ठेकेदारांच्या मिटिंग घ्यायच्या तू हे काम कर हे करू नको अशा धमक्या द्यायच्या, त्यातून कमिशन गोळा करायचे हे यांचे उद्योग चालू आहेत. यांनी कोणाकोणाला धमक्या दिल्या याचे सर्व पुरावे आहेत आणि या गोष्टी सर्वांना माहिती आहे.
नगरपालिकेच्या ओपनस्पेस वर स्वतःच्या शाळा बांधल्या त्यात येणाऱ्या नाल्याचे प्रवाह बदलले, लाडक्या मामेभाऊला काम देऊन सरकारी पैशातून नाल्यावर पूल बांधले, आणि शाळेचे उत्पन्न स्वतः खातात, जागा नगरपालिकेचे आणि उत्पन्न यांचे घरातील सहा लोक शाळेत कामाला सरकारी पगार आणि एक दिवस कामाला जात नाहीत. जय दुर्गा पतपेढी प्राथमिक माध्यमिक विद्यालय ही लेवा पाटील लोकांची संस्था ट्रस्टी असलेली संस्था सुनील महाजन यांनी दादागिरीच्या जोरावर बळकावली. प्रकाश महाजन, संगीता महाजन, योगेश महाजन, विनायक महाजन, युवराज पाटील व नेमाडे यांच्या सारख्या लोकांना बाजूला केले.
जळगाव मधील भंगार गोळा करायचे काम,दुसऱ्या व्यक्तीच्या नावे घेऊन भंगार कोणी विकले हे सर्वांना माहितीच आहे.
लाडका मामेभाऊ निरंजन पाटील व महेश पाटील यांनी गिरणा पम्पिंग जवळील ब्रिटीश कालीन पाईपलाईन काढून भंगार मध्ये विकली त्यातून कोट्यवधी रुपये कमाविले त्याची चौकशी लवकरच होणार आहे.
सन २०१९ नंतर आमदार राजुमामांच्या प्रयत्नातून मिळालेला निधी
अ.क्र. वर्ष योजनेचे नाव निधी
१. २०१९ ते २०२४ जिल्हा वार्षिक योजना १०५.४५ कोटी
२. २०१९ ते २०२४ आमदार स्थानिक निधी १५.८ कोटी
३. सरकार स्थापनेपासून मुलभूत व हद्दवाढ सुविधा ३३१.८८ कोटी
४. सरकार स्थापनेपासून उड्डाणपुलांसाठी १४० कोटी
एकूण निधी ५९३.१३ कोटी
सुनील महाजन म्हणतात कि राजुमामांनी एक काम केले ते दाखवावे ती केलेली कामे
१) जळगाव शहराच्या विकासासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या जळगाव शहर मनपा वरील असलेले कर्ज सरसकट फेडण्यात आले
२) जळगाव शहरातील चार मुख्य पूल जसे शिवाजीनगर उड्डाणपूल, पिंप्राळा उड्डाणपूल, शिवकॉलनी उड्डाणपूल, आसोदा उड्डाणपूल
३) जळगाव शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार १७५ ओपनस्पेस विकसित केलेले आहेत
४) जळगाव शहरात ८२२ ठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था केलेली आहे
५) जळगाव शहराच्या रस्त्यांसाठी भरगोस निधी उपलब्ध करून दिला
६) जळगाव एमआयडीसी साठी कुसुंबा येथे नवीन एमआयडीसी साठी प्रयत्न केले
७) पोलीस बांधवांसाठी घर बांधण्यासाठी वसाहतीसाठी ७० कोटीचा निधी दिला
८) जळगाव शहराच्या पर्यटन विकासासाठी १४ कोटी निधी दिला
९) जळगाव शहरात अल्पसंख्यांक समाजासाठी १ कोटी निधी मिळवून दिला
१०) जळगाव शहरात पिण्याच्या पाण्यासाठी २४९ कोटीचा भरीव निधी दिला
तसेच मुख्यमंत्री सहायता निधी तून अनेक गरीब नागरिकांना लाभ मिळवून दिला आहे त्यामुळे आमच्याकडे विकास कामे केल्याची भरपूर मोठी यादी असून विरोधकांकडे सुनील महाजन यांच्या नाचता येईना अंगण वाकडे अशी व्यथा झाली आहे त्यामुळे आम्ही फक्त विकासासाठीच काम करतो, त्त्यामुळे जनतेने आम्हाला दोन वेळेस प्रचंड मतांनी निवडून दिलेले असून हीच आमची विकासाची पावती असून सुनील महाजन यांना खुले आव्हान करतो कि अन्यथा न झाल्यास भर चौकात जनतेसमोर माफी मागावी या पत्रकार परिषदेला सुरेश भोळे, जिल्हा सरचिटणीस अरविंद देशमुख , ॲड.महेश जोशी, जितेंद्र मराठे, विधानसभा प्रमुख विशाल त्रिपाटी, जिल्हा प्रसिद्धी माध्यम प्रमुख मनोज भांडारकर, ज्येष्ठ उदयजी भालेराव, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील,प्रकाश पंडित, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.