जळगावअपघात

भरधाव ट्रकच्या धडकेत विवाहितेसह तरुणी ठार : जळगाव शहरातील मानराज पार्क जवळची घटना

चालकाला नशिराबाद येथे घेतले ताब्यात,घटना सीसीटीव्हीत कैद

लोकमाध्यम न्युज | जळगाव २८ ऑगस्ट २०२४ |

वाटिकाश्रमजवळील द्वारकाई अपार्टमेंटकडून जळगाव शहराकडे दुचाकीने बाजारात जात असलेल्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने विवाहितेसह 17 वर्षीय मुलीचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मानराज पार्कजवळ बुधवारी, 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली आहे. तर सोबत असलेला तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

पायल उर्फ खुशी देवेंद्र जलंकर (वय 17) आणि दिक्षिता राहूल पाटील (वय 27 दोन्ही रा. द्वारकाई अपार्टमेंट, वाटिकाश्रम, जळगाव) असे मयत दोघांची नावे आहेत. द्वारकाई अपार्टमेंट येथे पायल जलंकर ही आई, वडील, लहान भाऊ यांच्यासह राहत होती. याच अपार्टमेंटमध्ये दिक्षिता पाटील या विवाहिता माहेरी आलेल्या होत्या. दिक्षिता पाटील ह्या नाशिक येथील रहिवाशी असून त्यांच्या वडीलांच्या नातेवाईकांचे निधन झाले होते. त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून त्या माहेरी वाटिकाश्रम येथे आलेल्या होत्या. तसेच या अपार्टमेंटमध्ये राहणारे निलेश पाटील यांना मुलगा झाला होता. त्यामुळे मुलाला पहाण्यासाठी दिक्षिता पाटील या तीन वर्षाच्या मुलगा रूद्रा आणि पायल जलंकर यांच्यासोबत बुधवारी दि. 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता दुचाकीने हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाल्या होत्या.

खोटे नगरकडून जळगाव शहराकडे दुचाकीने जात असतांना मानराज पार्कजवळील पुलाच्या उतरतीवर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक देवून दोघांना चिरडले. या अपघातात दिक्षिता आणि पायल या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला रूद्र हा गंभीर जखमी झाला. ही घटना नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. दोघांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, घटनास्थळी माजी महापौर जयश्री महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शासकीय रुग्णालयात आमदार सुरेश भोळे यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी घटनेची माहिती आमदार भोळे यांनी जाणून घेतली. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button