
लोकमाध्यम न्युज | जळगांव १३ जानेवारी २०२५ |
आय एम ए जळगांव महिला डॉक्टर्स समितीतर्फे वैद्यकीय क्षेत्रातील नवीनतम प्रगतीवर यशस्वी कार्यशाळा व परिषदेचे आयोजन आणि प्रसिद्ध तज्ज्ञांकडून आरोग्यसेवेतील नवकल्पनांवर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन आय एम ए हाऊस जळगाव येथे केले. या कार्यक्रमाला १०० पेक्षा अधिक महिला वैद्यकीय व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला, ज्यामध्ये ज्ञानवृद्धी आणि कौशल्यविकासावर भर देण्यात आला.
डॉ. नंदिनी गोकुळचंन्द्रन, डॉ. अर्चना ठोंबरे, डॉ. वर्षा कुलकर्णी, डॉ. भावना चौधरी, डॉ.श्रद्धा आणि डॉ. नीलेश चांडक, डॉ.योगिता हिवरकर, डाॅ. रागिणी पाटील या तज्ञान्नी आर्थिक नियोजन, कर्करोग, आरोग्य, आहार तसेच विविध वैद्यकीय विषयांवर व्याख्याने दिली. कार्यक्रमात परिसंवादात्मक सत्रात डाॅ. अंजुम अमरेलीवाला आणि टीम , वादविवाद चर्चेत डॉ. वृषाली पाटील आणि टीम यांचा समावेश होता, ज्यामुळे उपस्थितांना वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपचारातील आधुनिक प्रगतीची उपयुक्त माहिती मिळाली.
या परिषदेच्या माध्यमातून आपल्या आरोग्यसेवा समुदायाला प्रगत तंत्रज्ञानाशी जोडणे आणि सर्व महिला डॉक्टरांना एकत्र आणणे,या उदिष्टाने प्रेरित होऊन ही परिषद आयोजित केल्याची माहिती आय एम ए जळगाव सचिव डॉ अनिता भोळे यांनी दिली.
परिषदेचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून आय एम ए जळगावचे राज्य व देशपातळीवर कार्यरत असलेले पदाधिकारी डॉ अनिल पाटील, डॉ विलास भोळे व आय एम ए जळगावचे अध्यक्ष डॉ. सुनील गाजरे यांच्या उपस्थितीत झाले.
या कार्यक्रमासाठी आय एम ए जळगाव महिला समितीच्या अध्यक्ष डॉ. शीतल अग्रवाल, सचिव डॉ. रेणुका चव्हाण आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे समारोप, आभारप्रदर्शन आणि आहार, आरोग्यसेवा सुधारण्यासाठी अशा सहकार्यात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या, आवाहनाने करण्यात आले.