राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे राहुल नार्वेकर यांच्या पुतळ्याचे दहन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिन्ह व पक्षअजित पवार गटाला देण्याचा निर्णया विरोधात आंदोलन
जळगांव दि.१६ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षातर्फे
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिन्ह व पक्ष अजित पवार गटाला देण्याचा निर्णया विरोधात विविध घोषणा देऊन व पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.सदर वेळी राहुल नर्वेकरांचा विरोधात विविध घोषणा देण्यात आल्या. ह्या वेळेस नार्वेकराणी दिलेला सदर निर्णय हा संविधान विरोधात व केंद्र सरकारच्या दबावाखाली येऊन दिलेला निर्णय आहे असा आरोप करण्यात आला.
ज्या वेळेस शिवसेनेचा निर्णय शिंदे यांच्या बाजूने लागला.त्याच प्रमाणे राष्ट्रवादीचाही निर्णय अजित पवार यांच्या बाजूने लागेल हे अपेक्षित होते.तरी सदर निर्णय हे लोकशाहीची हत्या करून दिलेले आहे.ज्या प्रमाणे एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून फुटले होते त्या वेळेस शब्दाचे पक्के असे मानले जाणारे अजित पवार यांचे वक्तव्य होते की एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडून येऊन दाखवावे.मग आता अजित पवार स्वतःचा पक्ष का स्थापन करत नाहीत.शरद पवारांनी प्रचंड मेहेनतिने स्थापन केलेल्या राष्ट्रवादी पक्षावर दावा का दाखवत आहेत.असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी युवक अध्यक्ष रिकु चौधरी, सहकार आघाडी जिल्हाअघ्यक्ष वाल्मिक पाटील , महिला अध्यक्ष मंगला पाटील , रमेश पाटील , रमेश बहारे , राजू मोरे , भाऊसाहेब इंगळे , शितल माशाने ,आशा येवले , संजय चव्हाण , अनिल पवार,आकाश हिवाळे, ॲड. राजेश गोयर , चेतन पवार , हितेश जावळे , ॲड.सचिन पाटील , डॉ रिजवान खाटीक , मतीन सय्यद , संजय जाधव , रियाज काकर , नंईम खाटीक , बशीर शाह , आयाज शाह , आदि उपस्थित होते.