पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शेकडो तरुणांचा दररोज शिवसेनेत प्रवेश : तरसोदचे युवक शिव बंधनात
लोकमाध्यम न्युज | जळगाव १९ सप्टेंबर २०२४ |
राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री, पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते मा. ना. गुलाबरावजी पाटील यांच्या कार्यकर्तृत्वावर व नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव ग्रामीण मधील तरसोद येथील शेकडो युवकांनी शिव बंधन बांधून आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मोठा जल्लोष करण्यात आला.
यांनी घेतला हाती भगवा
यावेळी प्रवेश करणाऱ्या मध्ये संतोष रमेश देवरे, निलेश शांताराम ठाकरे, तुषार शामराव काळे, विशाल देवरे, ज्ञानेश्वर बरहाटे, लोकेश शिंदे, सचिन शिंदे, महेश देवरे, रोशन राजपूत, सागर राजपूत, प्रकाश राजपूत, सतीश काळे, लोकेश चौधरी, प्रकाश पाटील , तुषार खंबायत यांनी पालकमंत्र्यांचे हस्ते तसेच तरुणांचे गळ्यातील ताईत जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्की दादा पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. यावेळी जय भवानी जय शिवराय व शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा जय – जयकार करण्यात आला.
उपस्थित मध्ये युवाउद्योजक युवानेते विक्रम गुलाबराव पाटील, प्रकाश धनगर, सागर पाटील, आबा माळी, राजू धनगर, कैलास इंगळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.