लोकमाध्यम न्युज | जळगाव ४ ऑक्टोबर २०२४ |
भक्तांच्या पाठीशी आणि दुर्जनांचे संहार करणारी आदिशक्ती भगवतीचे गुरुवार,4 रोजी शाटात आगमन झाले. शहरात दुर्गादेवीच्या मंडळांनी मिरवणूका काढुन विलोभनीय व देखण्या देवीच्या मूर्तीची स्थापना उत्साहात केली.पहिल्या माळेच्या रात्रीला भाविकांमध्ये दांडिया रंगल्याचे दिसले. तसेच देवीपाठ वाचनाला असंख्य महिलांनी सुरुवात केली.
विविध रुपात देवीची मूर्ती
फुले मार्केट परिसर गांधीमार्केट असोदा रोड, बहिणाबाई उद्यान परिसर, सिंधी कॉलनी परिसर,अजिंठा चौफुली याठिकाणी देवीची मूर्ती घेण्यासाठी शहरासह बाहेर गावाहून तरुण वाहन घेऊन आल्याने याठिकाणी दिवसभर गर्दीचा माहोल दिसला. येथे लहान देवीपासून विविध स्वरुपात आणि विविध आकारात देवीच्या आकर्षक , देखण्या देवीची मूर्ती विक्रीसाठी होत्या. दुर्गा देवी, सप्तश्रृंगी देवी, रेणुका देवी, कालिंका माता, वैष्णवी देवी अशा विविध स्वरुपाच्या मूर्ती येथे विक्रीला होत्या. याच ठिकाणी पूजा साहित्य, फुले, केळीचे पान, सजावट असे विविध दुकाने थाटली आहेत.
मंडळामध्ये उत्साह
शहरात विस्तारीत झालेल्या परिसरातही यंदा देवीचा जागवा दिसणार आहे. गरभानृत्ये, मान्यवरांच्या हस्ते आरती तसेच लहान मुलांसाठी स्पर्धा असे विविध उपक्रम राबविण्याची संकल्पना काही मंडळांनी घेतली आहे. त्यामुळे नवरात्रीचा जल्लोष, झगमगाट, नृत, सकाळी देवीचा पाठ अशा उपक्रमांनी सर्वत्र मंगलमय वातावरणाची अनुभूती पहिल्या माळेपासूनच होऊ लागली आहे. शहर व परिसरात 300 हून अधिक मंडळांकडून देवीची स्थापना करण्यात आली आहे.
कॉलन्याम्ाध्ये मोफत तर
शहरात सशुल्क प्रवेश
शहरात मयूर कॉलनीतील युवा फाउंडेशन, दादावाडीतील श्रीरामनगर मंडळ, दांडेकरनगरातील नुक्कड मित्र मंडळ याठिकाणी दांडियासाठी कोणालाही खेळता येंईल. खान्देश सेंट्रल येथे गुजराथी मित्र मंडळातर्फे समाज बांधवांना मोफत दांडिया खेळता येईल. अन्य चार मंडळात खेळण्यासाठी शुल्क आकारण्यात आले आहे.
सुभाष चौकात थाटली दुकाने
सुभाष चौकात भवानी माता मंदिर परिसरात विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटले असून येथे यात्रेचे स्वरुप आहे. पूजा साहित्य, संसारपयोगी वस्तू, खेळणे,भांडे अशी अनेक दुकाने सजली आहेत. भवानी माता परिसरात देवीचे दर्शनार्थ भाविकांसाठी सोय केली आहे. या ठिकाणी मंडळातर्फे देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
पोलिसांची गर्दीवर नजर
रंगसंगतीनुसार वेशभुषा
नवरात्रोत्सवात पहिल्या माळेपासून तर दसऱ्या पर्यत रंगसंगतीचे महिला वर्गाला खास आकर्षण असते. त्यामुळे रंगानुसार गरबा व दांडीया खेळण्यासाठी त्या त्या रंगानुसार वेशभूषा करण्यात येत आहे. तर सर्वसामान्य महिलाही त्या त्या रंगानुसार वस्त्रे परिधान करून दैनदिन कामे करताना दिसत आहेत.
आठव्या दिवशी रात्री 12 पर्यंत खेळा
मंडळाकडून स्थापन केलेल्या देवीसमोर दांडिया गरबाची खास रिंगण करण्यात आले आहे. परिसरात विद्युत रोषणाई, आणि गायनाची सोय आहे. याठिकाणी भाविक दांडिया नृत्य करतील. यासाठी संध्याकाळी देवीची पूजा आरतीनंतर दांडियानृत्याला सुरुवात होईल. रात्री दहावाजेपर्यत हा संगीतमय नृत्यसोहळा होईल. चार मंडळांनी खेळण्यासाठी शुल्क आकारले आहे. भाविकांना पाहण्यासाठी व्यवस्था केली आहे. नवरात्रीच्या आठव्या माळेपासून रात्री बारावाजेपर्यत वेळ देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.
गर्दीवर पोलिसांची नजर
देवी दर्शन करण्याबरोबरच मंडळांचे दांडिया- आरास नृत्य पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असणार आहे. महिला, युवती, लहान मुले यांची गर्दी उसळणार असल्याने याअनुषंगाने खबरदारीची उपाययोजना पोलिसांकडून करण्यात आली आहे. चौकाचौकात पोलीस निगरानी करणार असून मंडळाच्या विशेषत: दांडियाच्या ठिकाणी पोलिसांची तिक्ष्ण नजर आहे. महिला पोलीस, पोलीस कर्मचारी तसेच अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार आहेत. गर्दीमध्ये येताना महाग वस्तू किंवा दागिने, रोकड शक्यतो आणू नये, आणल्यास वस्तूंचा सांभाळ करण्यासाठी भाविकांनी सतर्कता घ्यावी. तसेच मदतीसाठी पोलिसांशी तत्काळ संपर्क साधावा,असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.