विजयश्री मिळविण्याचा डॉ.अश्विन सोनवणे यांना जनतेने दिला विश्वास
नेतृत्वाला अभूतपूर्व प्रतिसाद ; धार्मिक स्थळी दिल्या भेटी
लोकमाध्यम न्युज | जळगांव ११ नोव्हेंबर २०२४ |
जळगाव विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या प्रचाराने आता वेग धरला असून अनेक परिसरात जोरदार प्रचार सुरु आहे. यावेळी अनेक भगिनी डॉ.सोनवणे यांचे औक्षण करून विजयाचा आशीर्वाद देऊ लागले आहे.
दि.१० नोव्हेंबर २०२४ रोजी शहरातील इच्छादेवी चौक, शाहिद अब्दुल हमीद चौक, फुकट पुरा, बिसमिल्ला चौक, पटेल गल्ली, टिपू सुलतान चौक, बिलाल चौक, मेन रोड, महादेव मंदिर, मास्टर कॉलनी, नशेमन कॉलनी, सिंधी कॉलनी या परिसरात डॉ.अश्विन सोनवणे यांचा प्रचार दौरा असताना या परिसरातील नागरिकांनी डॉ.अश्विन सोनवणे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवत त्यांना भरभरून पाठिंबा दिला. डॉ.सोनवणे यांच्या प्रचाराने जल्लोषाचे वातावरण निर्माण केले होते.
डॉ.अश्विन सोनवणे यांचे कार्यकर्ते, आणि समर्थकांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने रस्ते गजबजून गेले होते, आणि “अश्विनभाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणा परिसरात घुमू लागल्या.
या परिसरातील अनेक धार्मिक स्थळी डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी भेट देऊन आशीर्वाद देखील घेतले. डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांना विधानसभा निवडणुकीत अनुक्रमांक १० तर निशाणी काचेचा पेला हि मिळाली असून जनतेने येणाऱ्या २० रोजी भरभरून मतदान करावे असे आवाहन देखील डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी केले आहे. यावेळी परिसरातील वसीम अली, वाहिद शेख,मेहमूद शेख,आमिन खान, सकलेन शेख,अक्रम शेख, भला तडवी,सहील पिंजारी,अलीम खान,कयूम शेख,नाजिम शेख, वाजीद पेहलवान,अब्दुल पटेल,कासिम शेख यांच्यासह अनेक नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.