जळगावविधानसभा निवडणूक
जळगाव शहर विधानसभा निवडणुकितील विजयाची हॅट्ट्रिक केल्याबद्दल आमदार राजु मामा भोळे यांचा मुस्लिम समाजा तर्फे सत्कार
लोकमाध्यम न्युज | जळगांव २७ नोव्हेंबर २०२४ |
जळगांव शहर मतदार संघातून तिसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल नवनिर्वाचित आमदार राजु मामा भोळे यांचा नुकताच मुस्लिम समाजातर्फे सत्कार करण्यात आला.
भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अशफाक खाटीक त्यांचे सहकारी व मुस्लिम समाजाने परिश्रम घेतले. व राजू मामा भोळे यांच्या विजयात आपले अनमोल योगदान दिले. त्याच बरोबर अशफाक खाटीक व त्यांच्या सहकार्यानी ख्वाजामियाँ दर्गाह वर चादर अर्पण करून मामांच्या विजयासाठी मनापासून मन्नत मानली होती ती मन्नत पूर्ण झाल्याची भावना अशफाक खाटीक यांनी व्यक्त करत. आ.राजु मामा भोळे यांचा सत्कार केला व मंत्री पदा साठी शुभेच्छा दिल्या.