पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा सप्तशृंगी मातेच्या चरणी नववर्षाचा संकल्प
लोकमाध्यम न्युज | जळगांव ३ जानेवारी २०२५ |
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नवीन वर्षाची सुरुवात वणी गडावरील सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले आणि राज्याच्या प्रगतीचा संकल्प केला.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी मातेच्या चरणी प्रार्थना करत, जिल्ह्यासह राज्याची प्रगती होऊ दे, शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होऊ दे, आणि राज्यातील प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पाणी मिळू दे,” असा दृढनिश्चय व्यक्त केला. त्यांनी राज्य सुजलाम सुफलाम होण्यासाठी आणि प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी आशीर्वाद मागितला.
भक्तिमय वातावरणात मंत्री गुलाबराव पाटील यांनी सप्तशृंगी मातेची पूजा अर्चा करून लोक कल्याणाच्या कामांसाठी प्रार्थना केली.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्री पाटील यांनी घेतलेल्या या संकल्पामुळे आणि राज्याच्या प्रगतीसाठी त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनाचा सर्वत्र गौरव होत आहे.