छत्रपती श्री शिवाजीराजे मराठा मंगल कार्यालयाचे नुतन अध्यक्षपदी आनंदराव मराठे यांची निवड

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २२ फेब्रुवारी २०२५ |
येथील दि ग्रेट मराठा बहुऊद्देशिय मंडळाची सर्वसाधारण सभा नियोजित छत्रपती शिवाजीराजे मराठा मंगल कार्यालयाचे शिरसोलीरोडवरील जागेवर नुकतीच संपन्न झाली.सभेच्या अध्यक्ष स्थानी विष्णुअप्पा मराठे(बाळदे)हे होते.सर्वप्रथम आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे पुजन माल्यार्पण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.महाराष्ट्र गिताने सुरुवात करण्यात आली.दिवंगत संस्थापक सदस्य अशोक एरंडे,अशोक साठे तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.संस्थापक सदस्यपदी नव्याने संजय एरंडे(पाचोरा )व विठ्ठल साठे(दापोरा)यांची निवड करण्यात आली.यावेळी आजिवन सदस्य होणेसाठी आवाहन करण्यात आले.
प्रस्तावनेत मावळते अध्यक्ष यांनी त्यांच्या कार्यकाळात सदरची जागा घेणेसाठी सर्व समाजबांधवांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.व कार्यबाहुल्ल्यामुळे वेळ देता येत नाही म्हणुन नविन अध्यक्ष निवडीचे आवाहन केले. यात सभेत सविस्तर चर्चा होऊन ऊद्योजक , आनंदराव मराठे यांची नूतन अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.नुतन अध्यक्ष आनंदराव मराठे यांनी आपल्या मनोगतात अध्यक्ष पदापुढे खुप आव्हाने असली तरी आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे आव्हान आपण पेलणार आहोत.व जळगांव येथे लवकरच भव्यदिव्य मराठामंगल कार्यालयाची वास्तू ऊभी करणार आहोत.असे सांगितले आता यापुढे “मी एकटा अध्यक्ष नसुन आपणही प्रत्येक समाजबांधव अध्यक्ष राहतील” यावर विष्णुअप्पा सह पदाधिकारी व सर्व ऊपस्थितांनी पाठबळ देणार असल्याचे स्पष्ट केले.चर्चत संजय जाधव,शालिग्राम मते,बाळूभाऊ मते,अशोक मते, मनोज पवार,किरण काळे,देवा भाऊ राक्षे ,सुरेश ठोंबरे,संभाजीराव काळे,ज्ञानेश्वर गुंजाळ ,प्रदिप दारकोंडे,नानाभाऊ बाळदे,आदिंनी भाग घेतला.या मराठा मंगल कार्यालयाचे ऊभारणीनंतर पहिल्या लग्नाच्या भोजनाचा पुर्ण खर्च आपण करणार असल्याचे मनोज पवार यांनी जाहिर केले. सर्वसाधारण सभेस भगवानराव मराठे, मराठासेवा संघाचे महानगर जिल्हाध्यक्ष इंजि हिरामण चव्हाण ,माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक ज्ञानेश्वर मोझे सर, सेवानिवृत्त सुभेदार शिवाजी शिंदे,भिका तांदळे,दगडू मोपारी,पंडितराव जाधव,यांचे सह मान्यवर मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.शेवटी आभार प्रदर्शन बाळासाहेब मोझे,व सुत्रसंचालन विनोद मराठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रविंद्र जगताप व छत्रपती शिवाजीराजे बहुऊद्देशिय संस्था( ईच्छादेवीनगर)कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





