
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २८ मार्च : कथा आणि कीर्तन हे मनशुद्धी करतात. पुण्यसंचय वृद्धींगत करतात. पूज्य व्यास महर्षिंचा *शब्दप्रसाद* म्हणजे ही शिवमहापुराण कथा होय. *सत्संग* जीवनाचा आधार आणि आत्म्याचा आहार आहे ज्यायोगे मनुष्य प्रसन्न राहतो. धर्मग्रंथांच ज्ञान प्राप्त करुन, भगवंताने पदरात टाकलेल्या सुखांना ओळखायला हवे असे देवदत्त महाराज यांनी कथेतून सांगितले,
पुढील वर्षी देखील असाच कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस युवा दशरथ नगर मित्र मंडळातर्फे करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा दशरथ नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष पवन कोळी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

शोभा यात्रेचे महत्त्व काय
कथेतून देवदत्त महाराज यांनी शोभा यात्रेचे महत्त्व सांगितले
सात दिवस कथेच्या श्रवणासाठी एखाद्या भाविकाला कामानिमित्त येणे शक्य नाही झाले तर भगवंत इतका दयाळू असतो की स्वतः आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी शोभा यात्रेच्या निमित्ताने भक्तांपर्यंत जाऊन दर्शन देत असतो.
कथेच्या संगतेच्या निमित्ताने भव्य शोभायात्रेच आयोजन करण्यात आले होते. दशरथ नगर, विघ्नहर्ता चौक, कालिंका माता मंदिर परिसर, योगेश्वर नगर, डी.एन.सी. कॉलेज परिसर येथून शोभायात्रा काढण्यात आली,भव्य अशा शोभायात्रेत हजारो भाविक उपस्थित होते.
जळगाव येथील दशरथ नगर परिसरात युवा दशरथ नगर मित्र मंडळ तर्फे आयोजित श्री शिव महापुराण कथेचा सातवा दिवस भक्तीमय वातावरणामध्ये संपन्न झाला.
आज गोपाळकाला रंगणार
आज कथेचा समारोप संध्याकाळी पाच वाजता गोपाळकाला करून होणार आहे.
ह भ प देवदत्त महाराज यांचे गोपाळ काल्याचे किर्तन होईल आणि त्यानंतर गोपाळ कल्याची दहीहंडी फोडण्यात येईल
कथा श्रवणासाठी आलेले भाविक लाह्या मुरमुरे दही यांसह मिष्ठान्न एकत्र करून गोपाळकाला एकमेकांना वाटणार आहेत.
उपस्थित जवळपास ३००० भाविकांना महाप्रसादाचा लाभ या निमित्ताने मिळणार आहे





