जळगावधार्मिक

अक्कलकोट येथील स्वामींच्या पालखी पादुका 19 रोजी जळगावात

लोकमाध्यम न्युज जळगांव दि.१७ : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या श्री स्वामी समर्थ पालखी – पादुकांचे सोमवार 19 रोजी शहरात
आगमन होणार आहे. सकाळी 11 वाजेला पालखीचे आगमन होऊन पूजा – अभिषेक व महाआरती नंतर लगेच महाप्रसाद (भंडारा)होणार असून भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात पालखी सोहळ्याचे हे 19 वे वर्ष आहे.
परगावच्या भाविकांना श्री स्वामींच्या दर्शनाचा लाभ व्हावा तसेच अक्कलकोट तिर्थस्थळी बांधण्यात येत असलेल्या
महाप्रसादालय व नवीन भक्त निवासाच्या बांधकामास निधी उपलब्ध व्हावा या उद्देशातून क्षेत्र अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्यावतीने पालखी परिक्रमेचे आयोजन करण्यात येते. ही पालखी महाराष्ट्र,कर्नाटक गोवा राज्यातून परिक्रमा करते. त्याअंतर्गत सोमवार दि.19 रोजी सकाळी 11 वाजेला पालखीचे शहरात आगमन होणार आहे. त्यानंतर पांडे डेअरी चौकाजवळील रामदेवबाबा मंदिर येथून पालखीची सवाद्य मिरवणुक गणेश वाडीतील सुकदेव शिरसाळे यांच्या निवासस्थानी येईल. त्यायाठिकाणी पूजा – अभिषेक व महाआरती होऊन लगेच महाप्रसाद (भंडारा) होईल. भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे शिरसाळे परिवारातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button