माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या प्रचार रॅलीत जल्लोष आणि फक्त जल्लोष…!
लोकमाध्यम न्युज | जळगांव १३ नोव्हेंबर २०२४ |
जळगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून, त्यांच्या आगमनावेळी गावागावात मोठा जल्लोष होताना दिसत आहे. ठिकठिकाणी महिला त्यांचे औक्षण करत आहेत. कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करून स्वागत केले जात आहे. त्यांच्या प्रचार रॅलीत अक्षरशः विजयी मिरवणुकीचा भास होत आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द, वंजारी खपाट, अहिरे खुर्द, सोनवद खुर्द व सोनवद बुद्रुक, तरडे, पष्टाणे आदी गावात प्रचार रॅली काढली. यावेळी तळागाळातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी त्यांनी समजून घेतल्या. सेवेची संधी मिळाल्यानंतर पिण्याच्या पाण्यासह सिंचन व्यवस्था, दिवाबत्ती, सार्वजनिक स्वच्छता, रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधा आधी पुरविल्या जातील, अशी ग्वाही देखील माजी मंत्री श्री.देवकर यांनी दिली.
यावेळी उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, धरणगाव तालुकाध्यक्ष जयदीप पाटील, महिला तालुकाध्यक्ष जनाबाई पाटील, संतोष सोनवणे, विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुका धनराज माळी, युवक अध्यक्ष मनोज पाटील, माजी जि.प.सदस्य रवींद्र पाटील, कृऊबासचे संचालक दिलीप धनगर, रंगराव सावंत, डॉ.नितीन पाटील, सोनवदचे सरपंच गुलाब पाटील, उपसरपंच नारायण देवरे, वंजारी खपाटचे तुषार चौधरी, विजय चौधरी, डॉ. दीपक पाटील, विकास चौधरी, बबलू काकडे, गोपाल चौधरी, अहिरे येथील शरद पाटील, संजय पाटील, पष्टाणे येथील अभय पाटील, विनायक पाटील, तरडे येथील चंद्रकांत पाटील, सोनवद येथील बाळासाहेब पाटील, उज्ज्वल पवार, संजय पाटील, धीरज पाटील, योगेश पाटील, भाऊसाहेब पाटील, भटू पाटील, पिंप्री खुर्दचे सुरज बच्छाव, शिवाजी गुजर, विजय सूर्यवंशी, नितीन सोनवणे, राजू पाटील उपस्थित होते.
तुमच्या प्रेमातून कधीच उतराई होऊ शकणार नाही...
महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना प्रचार रॅलीदरम्यान निंभोरा (ता.धरणगाव) येथील रोहिदास पाटील, राजेंद्र पाटील, कृष्णराव पाटील, शालीग्राम पाटील, बाळकृष्ण बोरसे, मांगोलाल सोनवणे, नितीन पाटील, पिंटू पाटील, दिलीप पाटील, विजय पाटील, कैलास पाटील, पुडलिक सोनवणे, प्रवीण सोनवणे, अनिल पाटील, जगदीश बोरसे यांनी सुमारे २५ हजार रूपयांचा मदत निधी सोपविला. तुमच्या प्रेमातून मी कधीच उतराई होऊ शकणार नाही, अशी भावना माजी मंत्री श्री.देवकर यांनी व्यक्त केली.