जळगांव दि. ९ : लोकसभा मिशन २०२४ अंतर्गत भारतीय जनता पार्टी जळगाव शहर, ग्रामीण ,व अंमळनेर विधानसभेची संयुक्त बैठक जी.एम. फाउंडेशन येथील नव्यानेच तयार झालेल्या भाजपा कार्यालयात पहिलीच बैठक आज दिनांक ९ मार्च रोजी दुपारी संपन्न झाली. यावेळी विकसित भारत रथाचे लोकार्पण आ. सुरेश भोळे (राजु मामा ) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. जळगाव लोकसभा निवडणूक संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. लोकसभा मिशन २०२४ ची सुरुवात करण्यात आली. बैठककिला आ .सुरेश भोळे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज , उज्वला बेंडाळे प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, प्रदेश सरचिटणीस अजय भोळे, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ राधेश्याम चौधरी यांनी मार्गदर्शन केले जिल्हा जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील यानी सूत्रसंचालन केले.या बैठकीस विधानसभा निवडणुक प्रमुख विशाल त्रिपाठी ग्रामीण चे चंद्रशेखर अत्तरदे तसेच अपेक्षित पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नंतर विकसित भारत रथाचे लोकार्पण आ सुरेश भोळे राजु मामा याच्या हस्ते करण्यात आले. याचे प्रमुख विठ्ठल पाटील असून सहा विधानसभा क्षेत्रात विकसित भारत रथा द्वारे केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती सादर करण्यात येणार आहे. असे भाजपा जळगांव जिल्हा मुख्य समन्वयक मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.
पांडुरंग महाले - संपादक
पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया
वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत
Related Articles
बोदवड येथे गटविकास अधिकारी तर , मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात ग्रामसेवकांची नियुक्ती करावी
March 2, 2024 । 11:51 am
Check Also
Close
- पिंप्राळ्यातील वटुकेश्वर महादेव मंदिरात चोरीJune 8, 2024 । 4:46 pm