रावेर लोकसभा मतदार संघात “स्मार्ट व्हिलेज” गाव योजना राबविणार
राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी केले नागरिकांना अश्वस्थ
भुसावळ दि.२७ : रावेर लोकसभा मतदार संघात “स्मार्ट व्हिलेज” योजना राबवून गावांना सक्षम करण्याचा व तळागाळातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी, वृद्ध महिला यांना न्याय देण्याचा प्रयत्न भावी काळात केला जाईल असे आश्वासन महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले.
रावेर लोकसभा मतदार संघातील भुसावळ तालुक्यातील गावांना शुक्रवारी प्रचार भेटी दरम्यान श्री पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली . भुसावळ तालुक्यातील साकेगाव, गोजोरा. सुनसगाव, गोंभी, वेल्हाळा , मांडवे दिगर, भिल्लमळी या गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. मांडवे दिगर व भिलमळी गावातील नागरिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. गावात घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही, वृद्ध महिलांना निराधार योजनेचा लाभ मिळत नाही, आरोग्य व्यवस्था नाही, डोंगराळ भाग असल्याने शेतमाल वाहतुकीसाठी व्यवस्था नाही अशा समस्या मांडल्या. यावेळी आपण नक्की विजयी व्हाल असे आश्वासन ग्रामस्थांनी दिले.
यावेळी जळगाव जिल्हा शिवसेना उपप्रमुख मुळे बाबा, तालुका प्रमुख भुसावळ संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्र संघटक राजूभाऊ इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी दीपक मराठे, वाय.आर. पाटील ,नाना पवार, शकील पटेल, बंडू पाटील, आर सी पवार, नामदेव भोई, अमोल मांडे, विजय कोळे, चंद्रकांत निकम, अर्जुन उपासे, विनोद पवार, पिंटू पाटील, पप्पू जकात, काँग्रेसचे योगेंद्रसिंग पाटील, पंकज पाटील ,अशफाक काजी, अतुल चौधरी, आयुष पाटील, धनराज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. मित्रपरिवार कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.
गोजोरा येथील भेटीत गावातील ज्येष्ठ नागरिक नथू सोनवणे आत्माराम डोळे, शांताराम डोळे, जीवन जावळे, भिका डोळे, नारायण तळले, तर सुनसगाव येथे लक्ष्मण कोळी, तानाजी पाटील, सुनील सोनवणे, संजय पाटील, अनिल पाटील, वनराज तळेले, सागर चौधरी, दिगंबर पाटील, वाल्मीक दोडे, संजय पाटील, ईश्वर कोळी, प्रमोद पाटील,चेतन कोळी, योगेश पाटील, संदीप कोळी, कुंदन पाटील,लीलाधर कोळी, विजय कोळी गावातील नागरिक उपस्थित होते. मांडवे दिगर येथे कैलास जाधव शिवसेना गणप्रमुख, विशाल पवार जिल्हाध्यक्ष सेवालाल, सैनिक सुरेश वाघ, गोपी पवार, सुरेश जाधव, विक्रम पवार, ताराचंद पवार, संतोष जाधव, रमेश पवार, आप्पा पवार, मांडवे दिगर व भिलमळी गावातील ज्येष्ठ महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष व मित्रपरिवार कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.