जळगावधार्मिक

श्री शिव महापुराण कथेची भव्य शोभा यात्रेने आज सांगता; सटाणा येथील प्रसिद्ध देव मामलेदार बँड खास आकर्षण

उद्या होणार गोपाळ काल्याचे किर्तन

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २७ मार्च २०२५ | दशरथ नगर येथे सुरू असणाऱ्या श्री शिव महापुराण कथेत सहाव्या दिवशी बारा ज्योतिर्लिंगाचे महत्व, महारुद्र अवतार कथा, कोटी रुद्र संहिता, नंदिकेश्वरांची जन्म कथा, गुरुकृपे चे महत्व सांगण्यात आले.

माणूस जन्माला येतो मात्र माणुसकी जन्माला आणावी लागते ती संस्काराने येते आणि संस्कार चित्त शुद्धीने होतात आणि चित्त शुद्धी फक्त भगवंताच्या नावाने आणि कथेने होत असते. दुर्लभ असा मनुष्य जन्म जीवाला मिळालेला असल्यामुळे त्याचे मूल्य ओळखून समाज उपयोगी कार्य तसेच देव कार्य करण्यात नेहमी अग्रेसर राहावे. भगवान शंकरांना पाणी सुद्धा प्रिय आहे, थोड्या पाण्याने सुद्धा शिव प्रसन्न होतात आणि म्हणूनच पाण्याचे मूल्य ओळखून आयुष्यात पाणी विनाकारण वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. जसे आम्ही आमचे धन काळजीपूर्वक सांभाळतो तसेच पाणीसद्धा काळजीपूर्वक सांभाळावे असे प्रतिपादन ह भ प देवदत्त महाराज यांनी कथेतून केले.

आज भव्य शोभायात्रा
आज श्री शिव महापुराण कथा चार वाजता सुरू होईल. आणि त्यानंतर कथेची सांगता संध्याकाळी पाच वाजता होणार असून नाशिक सटाणा येथील प्रसिद्ध देव मामलेदार बँड शोभायात्रा साठी बोलवण्यात आलेला आहे. भव्य अशा शोभायात्रेत ह भ प देवदत्त महाराज यांना बसण्यासाठी सजवलेली बग्गी तयार करण्यात येणारआहे.परिसरामध्ये सडा व रांगोळी काढण्यात येणार असून कलश व तुलस घेऊन पारंपारिक वेशात स्त्रीया व पुरुष लहान बालक उपस्थित असतील. जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक युवा दशरथ नगर मित्र मंडळ व पवन कोळी यांनी केले आहे

उद्या होणार गोपाळकाला
उद्या दिनांक २८ मार्च रोजी संध्याकाळी ५ ते ७ ह्या वेळेत कथेचा समारोप ह भ प देवदत्त महाराज यांच्या गोपाळकाल्याचे किर्तन आणि होणार असून त्यानंतर महाप्रसादाने कथेची सांगता होईल.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button