जळगावशैक्षणिक

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या : अतुल जैन

लोकमाध्यम न्युज जळगांव दि.१८ : कोणतीही अपेक्षा न ठेवता जर आपण जर कोणाला मदत केली तर त्यात आपल्याला खूप आनंद होतो. आपण दुसऱ्यांच्या जीवनात काही आनंद निर्माण करू शकलो तर त्याच्यासारखे चांगले काहीच नाही. असे केले तर आपले आयुष्य हे अर्थपूर्ण बनते. असे जैन प्रतिपादन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक व अनुभूती शाळेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले.

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल-सेकंडरी शाळेच्या १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावीनंतर पुढे काय? या विषयावर अतुल जैन यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी अनुभूती शाळेच्या संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी, जनसंपर्क अधिकारी मनोज दाडकर यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. पुढे बोलताना अतुल जैन पुढे बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांने जीवनात यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टींची तयारी ठेवावी. शिस्त, सातत्य आणि त्याग यातूनच त्यांना यशस्वी होता येईल. माझे आजोबा हिरालालजी यांनी लहानपणी मला एक गोष्ट सांगितली ती म्हणजे मेणबत्तीसारखे झिजणारे आपले आयुष्य हवे ते एखाद्या फटाक्यासारखे नसावे की जो एकदा फुटला की तो संपला. असे सांगत अनुभूती स्कूलचे सर्वचे सर्व विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झाल्याने त्यांनी विशेष कौतूक केले. त्यानंतर त्यांनी शैक्षणिक वाटचाली विषयी विद्यार्थ्यांना बोलते केले. आपली आवड, अभ्यास व पुढील करिअर निवडीविषयी मनोगत व्यक्त केले. करिअर निवडताना खूप काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.

बऱ्याच विद्यार्थ्यांनी ११ वी व १२वी सायन्स शाखेत प्रवेश घेऊन इंजिनियरींग करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर अतुल जैन यांनी सांगितले की, इंजिनियरिंगकडे जायचे असेल विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यापेक्षा सरळ पॉलिटेक्नीकला डिप्लोमा प्रवेश घेतला तर इंजिनियरींग ड्रॉइंग व गणित विषयाचा पाया भक्कम होईल यासह एक वर्ष वाचेल. दुसरे कारण असे की इंजिनियरींग डिप्लोमा केल्यास लगेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button