जळगांव जिल्हाकृषी

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा शिवसेना उबाठा ने दिला इशारा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

लोकमाध्यम न्युज जळगाव दि : १४ जून २०२५
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी व त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शिवसेना उबाठा च्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

जळगाव जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची भरपाई पंचनामे करून त्वरित मिळावी यासह नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे, महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळावे व सरसकट कर्जमाफी द्यावी. शासनाने शेतकी संघांना ज्वारी खरेदीची 3000 क्विंटल चे उद्दिष्ट हे दहा हजार क्विंटल पर्यंत करावे. शासनाकडून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना लाभार्थी आठ महिन्यापासून थकीत लाभ त्यांना त्वरित देण्यात यावा. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळावा यासह विविध मागण्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या.

शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात माजी आ. दिलीप भोळे जिल्हा संघटक करण पवार, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, तालुका प्रमुख उमेश पाटील, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, महानगर समन्वयक संतोष पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, अल्पसंख्यांक आघाडी महानगरप्रमुख जाकिर पठाण, उपमहा नगरप्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, कुसुंबा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे, विभाग प्रमुख किरण भावसार, विजय बांदल, शोएब खाटीक, कलीम खान, शरीफ रंगरेज, सचिन चौधरी विजय, राठोड आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button