क्राईमजळगांव जिल्हा

जिल्ह्यातुन हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारास दोन साथीदारांसह ठोकल्या बेड्या

गावठी कट्टा, जिवंत काडतूस व धारदार कोयता जप्त ; एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. २८ ऑक्टोंबर २०२५ : जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला सहज गुन्हेगाराला त्याच्या दोन साथीदारांसह गावठी कट्टा आणि धारदार कोयत्यासह एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात राहणारा तेजस दिलीप सोनवणे या सराईत गुन्हेगारास मा. उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांच्या आदेशान जळगाव जिल्ह्यातुन २ वर्षाकरीता हद्दपार करण्यात आलेले आहे. सदर हद्दपार असलेला ईसम हद्दपार आदेशाचे उल्लंघन करुन त्याचा साथीदारांसह घातक हत्यारांसह दहशत माजविण्याच्या उद्देशाने जळगाव शहरातील नेहरु नगर परिसरात फिरत असले बाबतची गोपनिय बातमी दि.२५/१०/२०२५ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना प्राप्त झाली. सदर गोपनीय बातमीच्या अनुषंगाने पोनि बबन आव्हाड यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोस्टे चे गुन्हे शोध पथकाचे पोउनि राहुल तायडे, सफौ विजसिंग દ पाटील, पोह गणेश शिरसाळे पोह प्रमोद लाडवंजारी, पोह किरण चौधरी, पोकों गणेश ठाकरे, पोकों किरण पाटील, पोकों नितीन ठाकुर, पोकों राहुल घेटे, पोकों योगेश घुगे अशांचे पथक नेमुण सदर पथकास योग्य त्या सुचना देवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले.

वर नमुद गुन्हे शोध पथकान तात्काळ जळगाव शहरातील शिरसोली रोड भागातील नेहरु नगर भागात गोपनिय माहिती काढून नेहरु भागात संदीपनी बॉईज हॉस्टेल परिसरात सापळा रचुन संशयितरित्या हालचाल करणा-या तिन युवक मिळुन आल्याने सदर संशयित ईसमांना पंचासमक्ष नाव गाव विचारता त्यांनी अनुक्रमे १) तेजस दिलीप सोनवणे वय २५, रा कांचन नगर जळगाव, २) खुशाल पितांबर सोनार, वय २१ रा. पार्वताबाई ओकनगर, कांचन नगर जळगाव, ३) चेतन पितांबर सोनार, वय २३, रा पार्वताबाई ओकनगर, कांचन नगर जळगाव असे सांगितले.

यामध्ये संशयित तेजस दिलीप सोनवणे वय २५, रा कांचन नगर जळगाव, यास उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांच्या आदेशान जळगाव जिल्ह्यातुन २ वर्षाकरीता हद्दपार करण्यात आलेले असतांना देखील तो हद्दपार आदेशाचे उल्लंघन करतांना मिळून आला. त्याच्यासोबत खुशाल पितांबर सोनार, वय २१ रा. पार्वताबाई ओकनगर, कांचन नगर जळगाव याचे अंगझडती मध्ये एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतुस मिळुन आले. तसेच संशयित चेतन पितांबर सोनार, वय २३, रा पार्वताबाई ओकनगर, कांचन नगर जळगाव याचे अंगझडीमध्ये धारदार पाते असलेला लोखंडी कोयता मिळूल आल्याने तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून घातक हत्यारे जप्त करण्यात आले. त्यांच्यावर एमआयडीसी पोस्टेला सिसिटीएनएस गुरन ७४९/२०२५ आर्म्स अॅक्ट ३/२५,४/२५, महाराष्ट्र पोलीस अधिनिअम कलम १४२ व ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५, सह भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याने सदर आरोपीतांना अटक करुन मा. न्यायालयात हजर केला असता त्यांना ०३ दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. सदर गुन्हाचा तपास पोउनि राहुल तायडे करीत व पोकों चेतन पाटील करत आहे.

ही कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगाव, नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव भाग, पोलीस निरीक्षक बबल आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button